चोरीला गेलेल्या २९ दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:29 IST2021-04-16T04:29:55+5:302021-04-16T04:29:55+5:30

हिंगोली : दुचाकी चोरून चेचिस क्रमांक व इंजिन क्रमांकावर खोडखाड करून बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करणाऱ्या दुचाकी चोरट्याला पोलिसांनी ...

29 stolen bikes seized | चोरीला गेलेल्या २९ दुचाकी जप्त

चोरीला गेलेल्या २९ दुचाकी जप्त

हिंगोली : दुचाकी चोरून चेचिस क्रमांक व इंजिन क्रमांकावर खोडखाड करून बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करणाऱ्या दुचाकी चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने आरोपीला १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून १० एप्रिल रोजी दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी तपासाच्या सूचना स्थागुशा पथकाला दिल्या होत्या. यातील आरोपी जिंतूर तालुक्यातील गडदगव्हाण येथे असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने सचिन ऊर्फ राजू रामा खिल्लारे (रा. गडदगव्हाण) यास ताब्यात घेतले. त्यास विचारपूस केली असता त्याने हरीदास व्यंकटीराम टापरे, अरविंद हरीदास टापरे (रा. पांगरी) या दोघांच्या मदतीने दुचाकी चोरून चेचिस नंबर व इंजिन नंबरची खाडाखोड करून बनावट कागदपत्रांच्या आधारे दुचाकी विकल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडून १५ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या २९ दुचाकी जप्त केल्या आहेत. यातील हरीदास टापरे दुचाकी चोरी करण्यात सराईत असून त्याच्यावर यापूर्वीही दुचाकी चोरल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. पोलिसांनी सचिन ऊर्फ राजू रामा खिल्लारे यास न्यायालयासमोर उभे केले असता त्याला १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्याकडून आणखी दुचाकी मिळण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पो.नि. उदय खंडेराय, हिंगोली ग्रामीणचे सपोनि. बी.आर. बंदखडके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. के.डी. पोटे, एस.एस. घेवारे, सपोउपनि बालाजी बोके, शंकर जाधव, विलास सोनवणे, अशोक धामणे, सुनील अंभोरे, विठ्ठल कोळेकर, संभाजी लेकुळे, भगवान आडे, शंकर ठोंबरे, राजू ठाकूर, किशोर कातकडे, विशाल घोळवे, ज्ञानेश्वर सावळे, किशोर सावंत, आकाश टापरे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघण, सुमित टाले, चालक शेख जावेद यांच्या पथकाने केली.

दुचाकी चोरटे निघाले मामा-भाचे

दुचाकी चोरट्यांनी हिंगोली २, नांदेड २, परभणी १, वाशिम, ३, औरंगाबाद २, अकोला १, बुलडाणा १ व इतर जिल्ह्यातून २९ दुचाकी चोरल्या. चेचिस व इंजिन नंबरमध्ये खाडाखोड करून दुचाकीची विक्री केली जात होती. यापूर्वी गडदगव्ळाण, दाभा, जोडपरळी, टेभूर्णी, डिग्रस येथे दुचाकी विक्री केल्या आहेत. विशेष म्हणजे दुचाकी चोरटे हे मामा-भाचे आहेत. दुचाकी चोरीची असल्याची माहिती असतानाही दुचाकी खरेदी केली का याचीही पोलीस चौकशी करणार आहेत. दरम्यान, ज्याची दुचाकी आहे, त्यांनी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात ओळख पटवून दुचाकी घेऊन जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: 29 stolen bikes seized