24 new patients added; Death of one | नव्याने २४ रुग्णांची भर; एकाचा मृत्यू

नव्याने २४ रुग्णांची भर; एकाचा मृत्यू

हिंगोली : आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या आरटीपीसीआर टेस्टमध्ये २१ जानेवारीला नव्याने २४ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत तर हिंगोली येथील आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे शिवाय ६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने आरपीटीसीआर व रॅपिड अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. हिंगोली, वसमत, कळमनुरी परिसरातील एकूण १९ संशयितांची तपासणी करण्यात आली होती. मात्र, यामध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही; परंतु, आरटीपीसीआर टेस्टमध्ये हिंगोली परिसरातील १६ तर कळमनुरी परिसरात ८ असे एकूण २४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

तसेच ६ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामध्ये हिंगोली येथील आयसोलेशनमधील चार तर वसमत येथील कोरोना केअर सेंटरमधील दोन बरे झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत कोरोनाचे ३ हजार ६८ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ३ हजार ५३५ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजघडीला ९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोरोनाबाधित ५६ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या पाच जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.

Web Title: 24 new patients added; Death of one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.