शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

सरत्या वर्षात २४ खून; घरफोडी, दंगे वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:51 IST

वर्षभरात जिल्ह्यात खुनाच्या २४ घटना घडल्या आहेत. तर बलात्काराच्या २५ घटना घडल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत काही गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी, इतर गुन्ह्यांत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देविविध ठाण्यात दाखल गुन्ह्यांची आकडेवारी

हिंगोली : वर्षभरात जिल्ह्यात खुनाच्या २४ घटना घडल्या आहेत. तर बलात्काराच्या २५ घटना घडल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत काही गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी, इतर गुन्ह्यांत वाढ झाली आहे. सरत्या वर्षात एकूण विविध प्रकारचे २ हजार ७० गुन्हे जिल्हाभरातील विविध ठाण्यांत दाखल करण्यात आली आहेत.दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आकडा फुगत चालला आहे. पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविल्या जातात. शांतता समित्यांच्या बैठका घेऊन कायदा हातात घेऊ नये, असे आवाहनही केले जाते. परंतु प्रत्येक्षात मात्र गुन्हेगारींच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत काही यावर्षात काही गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु इतर गंभीर गुन्ह्यांची आकेडवारीही वाढली आहे. पोलीस प्रशासनाने ११ नोव्हेंबर २०१८ अखेर दाखल गुन्ह्यांचा तुलनात्मक आराखडा सादर केला आहे. त्यानुसार गतवर्षी म्हणजेच ११ नोव्हेंबर २०१७ मध्ये खुनाच्या २७ घटना घडल्या होत्या. यावर्षी मात्र खुनाच्या घटनांचे प्रमाण कमी झाले आहे. यावर्षी २४ खुनाच्या घटना घडल्या आहेत. तर गतवर्षी बलात्काराच्या २४ घटना घडल्या होत्या. तर यावर्षी २५ घटना म्हणजेच बलात्काराच्या एका घटनेत वाढ झाली आहे. दरोड्याच्या प्रयत्नांच्या घटना यावर्षी ७ कमी घडल्या आहेत. गतवर्षी १५ घटना घडल्या होत्या. असे असले तरी, घरफोडीच्या घटनांचा आकडा फुगला आहे. गतवर्षी घरफोडीच्या ८३ घटना होत्या. तर यावर्षी ९० घटना आहेत. चोरीच्या घटनाने तर नागरिक भयभीत आहेत. गतवर्षी चोरीच्या १९३ घटना होत्या. तर यावर्षी हा आकडा वाढला असून वर्षभरात २१९ चोरीच्या घटना घडल्या आहेत. घराला कुलुप दिसले की, कुलुप तोडून ऐवज लंपास केला जात आहे. दिवाळी सणात तर घरातील मंडळी बाहेरगावी गेल्याने याच संधीचा चोरटे फायदा घेत सक्रीय झाले होते. दंगा करणे या घटनाही वाढल्या आहेत. गतवर्षी १११ दंगे केल्याचे गुन्हे दाखल होते. यावर्षी १५४ गुन्हे दाखल झाले. ठकवणुकीच्या घटनातही यंदा वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गतवर्षी ठकविणेप्रकरणी १८ गुन्हे दाखल झाले होते. तर यावर्षी २४ गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अपहरणाच्या घटना कमी आहेत. गतवर्षी अपहरण केल्याप्रकरणी ४० जणांवर गुन्हे दाखल केले होते. तर यावर्षी ३५ गुन्हे आहेत. विनयभंगाच्या घटनाही यंदा वाढल्या आहेत. गतवर्षी विविध पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी ८१ गुन्हे दाखल होते. तर यावर्षी विनयभंग प्रकरणी ९५ गुन्हे दाखल आहेत. आत्महत्येस प्रवृत करणे किंवा प्रयत्न केल्याच्या गतवर्षी १७ घटना घडल्या होत्या. यावर्षी ३६ घटनांची पोलीस ठाण्यात नोंद आहे. तसेच ईसीएक्ट, दारूबंदीच्या गुन्ह्यांत यावर्षी घट झाली आहे. तर जुगार खेळण्याणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. गतवर्षी जुगारप्रकरणी २६३ गुन्हे दाखल होते. यावर्षी ३३५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाकडून अवैध धंद्यांविरूद्ध दरदिवशी मोहीम राबविली जाते.पोलीस प्रशासनातील अधिकारीपोलीस प्रशासनातील अनेक पदे रिक्त आहेत. अधिकारी व कर्मचाºयांची पदे रिक्त असल्याने कामाचा अतिरिक्त ताण येतो. परिणामी कर्तव्य पार पाडताना पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना अनेक अडी-अडचणींना तोंड द्यावे लागते. विशेष म्हणजे नुकत्याच पोलीस अधिकाºयांच्या बदल्या झाल्याने पोलीस प्रशासनातील काही पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे शासनाने तात्काळ भरणे गरजेच आहे. ज्यामुळे संबधित विभागातील तसेच ठाण्यातील अधिकारी किंवा कर्मचाºयांवर अतिरिक्त कामाचा ताण येणार नाही.सण व हल्लाविविध सण व उत्सवात कायदा व सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यात बंदोबस्त ठेवला जातो. नागरिकांना शांततेचे आवाहन केले जाते. तरीही यंदा सण व हल्ल्याच्या १८ घटना वाढल्या आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारीHingoli policeहिंगोली पोलीसHingoli S Pपोलीस अधीक्षक, हिंगोली