जिल्ह्यात २३६ नवे कोरोना रुग्ण, सात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:32 IST2021-04-28T04:32:33+5:302021-04-28T04:32:33+5:30

आजपर्यंत कोरोनाचे १२ हजार १३३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १० हजार ४९० जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात ...

236 new corona patients, seven deaths in the district | जिल्ह्यात २३६ नवे कोरोना रुग्ण, सात मृत्यू

जिल्ह्यात २३६ नवे कोरोना रुग्ण, सात मृत्यू

आजपर्यंत कोरोनाचे १२ हजार १३३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १० हजार ४९० जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर सध्या १४३३ जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ४३८ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजनवर ठेवण्यात आले आहे. तर ४१ जण अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.

सात जणांचा मृत्यू

आज जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डातील सहा जणांचा मृत्यू झाला. यात गिरगाव, ता.वसमत येथील ६६ वर्षीय पुरुष, माळधामणीची ६५ वर्षीय महिला, वसमतची ५४ वर्षीय महिला, छत्रपतीनगरची ३५ वर्षीय महिला, जयपूरची ५० वर्षीय महिला, पिंपळदरीची ५५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे. तर नवीन कोविड रुग्णालय औंढा रोड येथे वाशिमच्या ४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. आजपर्यंत एकूण २१० रुग्णांचा मृत्यू झाला.

Web Title: 236 new corona patients, seven deaths in the district