वादळी वाऱ्यामुळे २०० झाडांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:03 IST2018-04-18T01:03:30+5:302018-04-18T01:03:30+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील पुरजळ शिवारामध्ये सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वादळी वाºयासह गारांचा पाऊस झाला. त्यामध्ये एका शेतक-याच्या आंब्याच्या बागेतील दोनशे झाडांचे नुकसान झाले. आंब्याच्या झाडाखाली कै-यांचा सडा पडला होता.

वादळी वाऱ्यामुळे २०० झाडांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील पुरजळ शिवारामध्ये सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वादळी वाºयासह गारांचा पाऊस झाला. त्यामध्ये एका शेतक-याच्या आंब्याच्या बागेतील दोनशे झाडांचे नुकसान झाले. आंब्याच्या झाडाखाली कै-यांचा सडा पडला होता.
जवळा बाजार येथील शेतकरी सागर कमलाकर नवले यांचे पुरजळ शिवारामध्ये गट क्र. १९४ मध्ये चार एकर आंब्याची बाग आहे. या बागेतील सोमवारी झालेल्या वादळी वाºयाने सुमारे २०० झाडांचे अंदाजे २० ते ३० क्विंटल कच्चे आंबे पडले असून अंदाजे १ लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती पुरजळच्या तलाठी एस.व्ही. सिरसाठ यांना दिली असता त्यांनी मंगळवारी पंचनामा केला.
दोन बैल ठार
औंढा तालुक्यातील पोटा शेळके येथे सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वीज कोसळून शेतामधील दोन बैल जागीच ठार झाल्याची घटना घडली. पोटा शेळके येथील अल्पभूधारक शेतकरी फुलाजी दौलतराव शेळके यांचे वीज कोसळून दोन बैल जागीच ठार झाल्याने अंदाज साठ हजारांचे नुकसान झाले. मंगळवारी पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ. जावळे यांनी पंचनामा केला. घटनेची दखल घेऊन तहसीलने शेतकºयांना नुकसान झालेल्या फळबागेची व बैल ठार झाल्याची भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.