जिल्ह्यात कोविडचे नवीन २ रुग्ण; २ रुग्ण बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:39 IST2020-12-30T04:39:22+5:302020-12-30T04:39:22+5:30
काेराेना विषाणू चाचणीत आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसरात २ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरातील नारायण नगर भागातील एक व ...

जिल्ह्यात कोविडचे नवीन २ रुग्ण; २ रुग्ण बरे
काेराेना विषाणू चाचणीत आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसरात २ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरातील नारायण नगर भागातील एक व सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथील एकजण बाधित आढळून आला आहे. तर २ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी साेडण्यात आले आहे. तसेच रॅपिड ॲंटिजन तपासणीद्वारे हिंगाेली परिसरातील ४, सेनगाव २, वसमत १६ ,औंढा नागनाथ २२, कळमनुरी २० अशा एकूण ६४ जणांची तपासणी केेली.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वाॅर्डमध्ये २ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे़ एका कोविड रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोविडचे एकूण ३ हजार ५०७ रुग्ण झाले असून, त्यापैकी ३ हजार ४०५ रुग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात एकूण ४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच कोविडमुळे जिल्ह्यात आतापर्यंत ५३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.