कोरोनाचे नवे २ रुग्ण ; पाच बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:20 IST2021-07-04T04:20:40+5:302021-07-04T04:20:40+5:30

अँटिजन चाचणीत हिंगोली परिसरात २५० पैकी रिसोड येथील १, वसमत परिसरात २४ पैकी कुरुंदा येथील १ रुग्ण आढळला. तर ...

2 new patients with corona; Five heals | कोरोनाचे नवे २ रुग्ण ; पाच बरे

कोरोनाचे नवे २ रुग्ण ; पाच बरे

अँटिजन चाचणीत हिंगोली परिसरात २५० पैकी रिसोड येथील १, वसमत परिसरात २४ पैकी कुरुंदा येथील १ रुग्ण आढळला. तर औंढा परिसरात १३२, कळमनुरी परिसरात ७२४ व सेनगाव परिसरात ६० जणांची तपासणी केली असता एकही बाधित आढळला नाही. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली १२७, कळमनुरी ९७, औंढा ३९, वसमत ४५ अशा चाचण्या करूनही कोणी बाधित आढळले नाही. शनिवारी जिल्हा रुग्णालयातून बरे झालेल्या पाच जणांना डिस्चार्ज दिला आहे.

आजपर्यंत कोरोनाचे एकूण १५ हजार ९५० रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १५ हजार ५३८ जणांवर उपचार केल्याने बरे झाले. तर ३८३ जणांचा मृत्यू झाला. तर २९ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. यापैकी १२ जणांची प्रकृती गंभीर असल्याने ऑक्सिजनवर असून ३ जण अतिगंभीर असल्याने बायपॅपवर आहेत.

Web Title: 2 new patients with corona; Five heals