जिल्ह्यात कोरोनाचे नवे २ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:19 IST2021-07-19T04:19:53+5:302021-07-19T04:19:53+5:30

जिल्ह्यात हिंगोली परिसरात १७८, सेनगाव १५, औंढा १३५, वसमत ४०, कळमनुरी ७८ अशा ४४६ जणांची रॅपिड अँटिजेन तपासणी केली ...

2 new corona patients in the district | जिल्ह्यात कोरोनाचे नवे २ रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे नवे २ रुग्ण

जिल्ह्यात हिंगोली परिसरात १७८, सेनगाव १५, औंढा १३५, वसमत ४०, कळमनुरी ७८ अशा ४४६ जणांची रॅपिड अँटिजेन तपासणी केली असता यात एकही रुग्ण आढळला नाही. मात्र आरटीपीसीआर तपासणीत २ रुग्ण आढळले. यावेळी हिंगोली परिसरात ३६२, औंढा ४७, वसमत ६, कळमनुरी परिसरात ९६ अशा ५११ जणांची आरटीपीसीआर तपासणी केली होती. त्यात हिंगोली परिसरात आनंद नगर व औंढा परिसरात चिंचोली देवबा येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. हिंगोलीतील आयसोलेशन वाॅर्डात उपचार घेणारा एक रुग्ण बरा झाल्याने त्यास घरी सोडण्यात आले. दरम्यान, आजपर्यंत जिल्ह्यात १५ हजार ९६५ रुग्ण आढळले असून त्यापैकी १५ हजार ५७१ रुग्ण बरे झाले आहेत. तर आजपर्यंत ३८६ रुग्णांचा मृत्यू झाला. आजघडीला ८ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी ४ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

Web Title: 2 new corona patients in the district