कोरोनाचे नवे २ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST2021-07-23T04:19:11+5:302021-07-23T04:19:11+5:30

जिल्ह्यात अँटिजन चाचणीत हिंगोली ९२, सेनगाव ३७, औंढा २६, वसमत ७६, कळमनुरी २१७, अशी एकूण ४४८ जणांची तपासणी करण्यात ...

2 new corona patients | कोरोनाचे नवे २ रुग्ण

कोरोनाचे नवे २ रुग्ण

जिल्ह्यात अँटिजन चाचणीत हिंगोली ९२, सेनगाव ३७, औंढा २६, वसमत ७६, कळमनुरी २१७, अशी एकूण ४४८ जणांची तपासणी करण्यात आली. मात्र, एकही बाधित आढळला नाही. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोलीत २६ पैकी साळवा १ व आमला १, असे दोन रुग्ण आढळले. सेनगाव परिसरात ३६ पैकी एकही बाधित आढळला नाही. आजपर्यंत जिल्ह्यात १५ हजार ९७५ रुग्ण बरे झाले आहेत. त्यापैकी १५ हजार ५७४ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या १५ जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत कोरोनाने ३८६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या दाखल असलेल्यांपैकी ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर, तर २ जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.

Web Title: 2 new corona patients