खाजगी व शासकीय रूग्णालयातील १८० ऑक्सिजन बेड शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:31 IST2021-05-11T04:31:24+5:302021-05-11T04:31:24+5:30

जिल्ह्यात ९ मे पर्यंत १४ हजार १८३ कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी १३ हजार १९ रूग्ण बरे झाल्याने त्यांना ...

180 Oxygen Beds left in private and government hospitals | खाजगी व शासकीय रूग्णालयातील १८० ऑक्सिजन बेड शिल्लक

खाजगी व शासकीय रूग्णालयातील १८० ऑक्सिजन बेड शिल्लक

जिल्ह्यात ९ मे पर्यंत १४ हजार १८३ कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी १३ हजार १९ रूग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात शासकीय रूग्णालयातच रूग्णांना उपचारासाठी दाखल करावे लागत असल्याने गंभीर रूग्णांना ऑक्सिजन युक्त बेड मिळविताना कसरत करावी लागत होती. मात्र आरोग्य प्रशासनाने जिल्हा रूग्णालय, नवीन रूग्णालय, हिंगोली, उपजिल्हा रूग्णालय कळमनुरी, वसमत, सिद्धेश्वर, कौठा या ठिकाणी कोविड रूग्णालय सुरू करून ऑक्सिजन युक्त बेड उपलब्ध करून दिले आहेत. सध्या जिल्हा रूग्णालयात १५, नवीन कोविड सेंटर हिंगोली येथे ०, कळमनुरी ५६, वसमत १६, सिद्धेश्वर ३, कौठा ० असे ९० ऑक्सिजन असलेले बेड शिल्लक आहेत. तसेच खाजगी कोविड रूग्णालयातही ९० ऑक्सिजन बेड शिल्लक आहेत. यात महेश कोविड हॉस्पिटल येथे १८, नाकाडे हॉस्पिटल ९, आयकॉन ३, माउली ४, तिरूमला ०, शिवम ११, पतंगे १०, सातपुते ९, संजीवनी १०, विवेकानंद ६, द्वारका ०, जगदंबा हॉस्पिटल येथील १० ऑक्सिजन बेडचा समावेश आहे.

Web Title: 180 Oxygen Beds left in private and government hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.