जिल्ह्यात काेराेनाचे १८ नवे रुग्ण; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST2021-01-13T05:18:24+5:302021-01-13T05:18:24+5:30
रॅपिड अँटिजन तपासणीत सेनगाव परिसरात २ रुग्ण आढळले, तर आरटीपीसीआरद्वारे आढळून आलेल्या रुग्णांमध्ये हिंगोली परिसरातील १८ रुग्णांचा समावेश आहे. ...

जिल्ह्यात काेराेनाचे १८ नवे रुग्ण; एकाचा मृत्यू
रॅपिड अँटिजन तपासणीत सेनगाव परिसरात २ रुग्ण आढळले, तर आरटीपीसीआरद्वारे आढळून आलेल्या रुग्णांमध्ये हिंगोली परिसरातील १८ रुग्णांचा समावेश आहे. २ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी साेडण्यात आले. काेराेनामुळे हिंगोली तालुक्यातील एकंबा येेथील ७३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. कोरोनाचे एकूण ३५९३ रुग्ण झाले आहेत. ३४६२ रुग्ण बरे झाले आहेत. आजघडीला एकूण ७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ५५ रुग्णांचा मृत्यू झाला.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वाॅर्ड येथे भरती असलेल्या रुग्णांपैकी ५ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन देण्यात येत आहे. एका रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यास बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. एकूण सहा रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे आराेग्य विभागाने पत्रकाद्वारे कळविले आहे.