बेस्टच्या सेवेसाठी हिंगोली आगाराचे १६ चालक - वाहक रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:26 IST2021-04-19T04:26:44+5:302021-04-19T04:26:44+5:30

फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बेस्टच्या सेवेसाठी चालक - वाहकांची कमतरता असल्यामुळे हिंगोली आगारातून ...

16 drivers-carriers of Hingoli depot left for BEST service | बेस्टच्या सेवेसाठी हिंगोली आगाराचे १६ चालक - वाहक रवाना

बेस्टच्या सेवेसाठी हिंगोली आगाराचे १६ चालक - वाहक रवाना

फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बेस्टच्या सेवेसाठी चालक - वाहकांची कमतरता असल्यामुळे हिंगोली आगारातून चालक - वाहकांना पाठविण्यात आल्याची माहिती स्थानकप्रमुख संजयकुमार पुंडगे यांनी दिली. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, वसमत आणि कळमनुरी असे तीन आगार सद्यस्थितीत कार्यरत आहेत. २३ मार्च २०२०पासून कोरोना महामारीने सर्वत्र पाय रोवले आहेत. २० नोव्हेंबर २०२०पासून तिन्ही आगारातून चालक, वाहक आणि कंट्रोलर यांना पाठविण्यात येत आहे. एकूण ९ वेळा हिंगोली आगारातून चालक, वाहक आणि कंट्रोलरला पाठविले गेले आहेत. मागच्या वेळी बेस्टच्या सेवेसाठी गेलेले चालक - वाहक पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांच्या मनात मुंबईला जावे की नाही, याबाबत संभ्रावस्था दिसून येत होती. परंतु, शासनाचा आदेश असल्याने अखेर त्यांंना मुंबईला बेस्टच्या सेवेसाठी जावे लागले आहे.

चालक - वाहकांची काळजी घेतली जाणार

बेस्टच्या सेवेसाठी पाठविण्यात आलेल्या हिंगोली आगारातील आठ चालक, आठ वाहक आणि एक कंट्रोल यांची पुरेपूर काळजी घेतली जाणार आहे. त्यांना मास्क, सॅनिटायर हे एस. टी. महामंडळाच्या वतीने पुरविण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे पंधरा दिवस चालक - वाहकांना पाठविण्यात येत आहे.

- संजयकुमार पुंडगे, स्थानक प्रमुख, हिंगोली

Web Title: 16 drivers-carriers of Hingoli depot left for BEST service