नवीन कोरोनाचे १३ रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST2021-02-05T07:53:31+5:302021-02-05T07:53:31+5:30
जिल्ह्यात वसमत व कळमनुरी परिसरातील २२ जणांची रॅपीड ॲटीजेन टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला ...

नवीन कोरोनाचे १३ रुग्ण आढळले
जिल्ह्यात वसमत व कळमनुरी परिसरातील २२ जणांची रॅपीड ॲटीजेन टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. परंतु, हिंगोली, कळमनुरी, वसमत परिसरातील संशयित रुग्णांची तपासणी केली असता यामध्ये १३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यात हिंगोली ८, कळमनुरी २, तर वसमत परिसरातील ३ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, हिंगोली येथील आयसोलेशन वाॅर्डातील १८ तर कळमनुरी कोरोना केअर सेंटरमधील ४ रुग्ण बरे झाल्याने अशा २२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ हजार ७३५ झाली असून यातील ३ हजार ६०२ रुग्णांना घरी सोडले आहे. आतापर्यंत एकूण ५६ रुग्णांचा मृत्यू झाला. आजघडीला ७७ रुग्णांवर उपचार सुरू असून यातील चार रुग्ण गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवले आहे. एका रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे.