हिंगोली जिल्ह्यात नव्याने १२ कोरोना रुग्ण आढळले; १० बरे झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 19:57 IST2021-01-19T19:57:19+5:302021-01-19T19:57:43+5:30
हिंगोली येथील आयसोलेशन वॉर्डामध्ये ९ तर औंढा येथील कोरोना केअर सेंटरमधील एक रुग्ण बरा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यात नव्याने १२ कोरोना रुग्ण आढळले; १० बरे झाले
हिंगोली: जिल्ह्यात रॅपीड अँटीजन टेस्ट कॅप व आरटीपीसीआर टेस्ट द्वारे नव्याने कोरोनाचे १२ रुग्ण आढळून आले आहेत. तर १० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यत रुग्णांची संख्या ३ हजार ५५७ झाली आहे. जिल्ह्यात हिंगोली, वसमत, कळमनुरी, सेनगाव, औंढा परिसरात रॅपीड अँटीजन टेस्ट कँप लावण्यात आले होते. यावेळी १०६ संशयितांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये हिंगोली परिसरात कोरोना बाधीत एक रूग्ण आढळून आला आहे. तसेच आरटीपीसीआर टेस्टमध्ये हिंगोली परिसरात ४ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. वसमत २, सेनगाव ४ तर कळमनुरी परिसरात १ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे दिवसभरातील कोरोना बाधीतांची संख्या १२ झाली आहे.
हिंगोली येथील आयसोलेशन वॉर्डामध्ये ९ तर औंढा येथील कोरोना केअर सेंटरमधील एक रुग्ण बरा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यत ३ हजार ६५७ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ३ हजार ५२३ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजघडीला एकूण ७९ कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यत ५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सीजनवर ठेवण्यात आले आहे. एका रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे.