पीएम केअर फंडातून जिल्ह्याला ११२ व्हेंटिलेटर्स; त्यातील १७ बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:29 IST2021-05-14T04:29:12+5:302021-05-14T04:29:12+5:30
७ आधीच बंद पीएम केअरमधून मिळालेल्या व्हेंटिलेटर्सपैकी ७ आधीच बंद असल्याचे आढळून आले. तर नव्याने १० मिळाले असले तरीही ...

पीएम केअर फंडातून जिल्ह्याला ११२ व्हेंटिलेटर्स; त्यातील १७ बंदच
७ आधीच बंद
पीएम केअरमधून मिळालेल्या व्हेंटिलेटर्सपैकी ७ आधीच बंद असल्याचे आढळून आले. तर नव्याने १० मिळाले असले तरीही त्यांचे इन्स्टॉलेशन बाकी असल्याने त्यांचाही काही वापर करता येत नाही. शिवाय तंत्रज्ञ उपलब्ध होत नसल्याने नेमका कुणाशी संपर्क साधायचा, हे कळायला मार्ग नाही.
जिल्हा रुग्णालय
हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात सध्या ३४ व्हेंटिलेटर सुरू आहेत. तर १० इन्स्टॉलेशनसाठी पडून आहेत. तंत्रज्ञ येत नसल्याने त्यांचा वापर कधी सुरू होईल, हा प्रश्न आहे. जे आहेत त्यांचाही वापर फिजिशियन असल्याशिवाय होत नाही.
वसमत उपजिल्हा रुग्णालय
वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयाला २० व्हेंटिलेटर दिले असून ते सुरू आहेत. गरजेनुसार त्यांचा वापर करण्यात येत आहे. त्यातील काही नवीन आयटीआयला हलविण्याचाही विचार केला जात आहे.
कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय
कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात २० व्हेंटिलेटर दिले आहेत. मात्र, त्यांचा वापरच येथील डॉक्टर करू शकत नसल्याने अनेकदा निवेदनबाजी झाली. अजूनही ते वापरण्यास टाळाटाळच सुरू असते.
नवीन कोविड सेंटर व कवठा
हिंगोली येथील नवीन कोविड सेंटरला ११ तर कवठा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड सेंटरला १० व्हेंटिलेटर दिले आहेत. प्रशिक्षण दिलेल्या डॉक्टरांकडून त्यांचा वापर सुरू आहे.