सात दिवसांत ११ पॉझिटिव्ह; यातील ८ जणांचे लसीकरण होते बाकी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:33 IST2021-08-12T04:33:32+5:302021-08-12T04:33:32+5:30
हिंगोली : जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यास प्रशासनाला यश आले असले तरी अजूनही अनेकांनी लस घेतलेली नाही. त्यामुळे कोरोनाची भीती ...

सात दिवसांत ११ पॉझिटिव्ह; यातील ८ जणांचे लसीकरण होते बाकी!
हिंगोली : जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यास प्रशासनाला यश आले असले तरी अजूनही अनेकांनी लस घेतलेली नाही. त्यामुळे कोरोनाची भीती कायम आहे. कोरोना लस न घेतलेलेच जास्त कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. सध्या उपचार सुरू असलेल्या ११ पैकी ८ रुग्णांनी लस घेतली नव्हती.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाला ब्रेक लागला आहे. मात्र बाजारपेठेतील वाढती गर्दी पुन्हा धोक्याचा इशारा देत आहे. सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर कोणीच करीत नसल्याचे दिसत आहे. सायंकाळपर्यंत बाजारपेठेतील गर्दी कायम दिसत आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी जास्तीतजास्त लसीकरण होणे गरजेचे असताना नागरिक मात्र लस घेण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे कोरोनाला आमंत्रणच मिळत आहे.
कुठल्या गटात किती लसीकरण?
गट पहिला डोस दुसरा डोस
हेल्थ वर्कर - ७१६० ५०७४
फ्रंट वर्कर - १३५५२ ७६७४
१८ ते ४५ - ९०३१९ ७८४०
४५ ते ६० - ६२९६७ २३६१०
ज्येष्ठ - ६००१७ १७८११
जिल्ह्यात कधी किती पॉझिटिव्ह?
वार पॉझिटिव्ह
बुधवार ००
गुरुवार ०१
शुक्रवार ०२
शनिवार ०३
रविवार ०२
सोमवार ०१
मंगळवार ०२
ग्रामीण भागात सर्वांत कमी लसीकरण
जिल्ह्यात लसीकरणाला प्रतिसाद मिळत असला तरी अद्याप ग्रामीण भागात लसीकरण मोहिमेला गती आलेली नाही. शहरी भागातील नागरिकच स्वयंस्फूर्तीने लस घेत आहेत. त्यामुळेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून येत आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश जास्त आहे.
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जास्तीतजास्त लसीकरण होणे गरजेचे आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लस घेण्यासाठी पुढाकार घ्यावा.
- डॉ. देवेंद्र जायभाये, वैद्यकीय अधिकारी