कृष्णापूर येथेही १० कोंबड्या दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:27 AM2021-01-22T04:27:40+5:302021-01-22T04:27:40+5:30

दरम्यान, आज कळमनुरी तालुक्यातील कृष्णापूर येथेही ९ कोंबड्या दगावल्या आहेत. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाची डोकेदुखी वाढली आहे. या ठिकाणच्या मृत ...

10 hens were also slaughtered at Krishnapur | कृष्णापूर येथेही १० कोंबड्या दगावल्या

कृष्णापूर येथेही १० कोंबड्या दगावल्या

Next

दरम्यान, आज कळमनुरी तालुक्यातील कृष्णापूर येथेही ९ कोंबड्या दगावल्या आहेत. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाची डोकेदुखी वाढली आहे. या ठिकाणच्या मृत पक्ष्यांचे नमुनेही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतरच या कोंबड्या कशाने दगावल्या, हे स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत हा भागही प्रतिबंधित राहणार आहे.

जिल्ह्यात २१ पोल्ट्री फार्म

हिंगोली जिल्ह्यात एकूण २१ पोल्ट्री फार्म असून, यापैकी १२ मोठे व ९ लहान आहेत. ते जवळा, झरा, येडशी, कोंडूर, वडगाव, वारंगा फाटा, पानकनेरगाव, पुसेगाव, चिंचोली, पांगरी, बोराळा, इंचा, बासंबा या भागांत आहेत. त्यामध्ये १ लाख ६४ हजार पक्षी आहेत.

परभणीनंतर हिंगोलीत शिरकाव

शेजारच्या परभणी जिल्ह्यात आधी बर्ड फ्लूमुळे पक्षी मृत झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातूनच तेथे पक्षी नेल्याचे सांगितले जात असल्याने काही काळ यामुळे पोल्ट्रीधारक हैराण होते. आता तर येथे पिंपरीतील कोंबड्यांना प्रत्यक्षच लागण झाल्याचे समोर आले आहे.

Web Title: 10 hens were also slaughtered at Krishnapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.