रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांना १० दिवसांचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST2021-09-03T04:30:14+5:302021-09-03T04:30:14+5:30

जिल्ह्यातील तोंडापूर, आंबा, आरळ, चुंचा, करंजी आदी गावांतील ३५ शेतकरी प्रशिक्षणात सहभागी झाले हाेते. पुढील दहा दिवस त्यांचे ...

10 days training to farmers for silk farming | रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांना १० दिवसांचे प्रशिक्षण

रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांना १० दिवसांचे प्रशिक्षण

जिल्ह्यातील तोंडापूर, आंबा, आरळ, चुंचा, करंजी आदी गावांतील ३५ शेतकरी प्रशिक्षणात सहभागी झाले हाेते. पुढील दहा दिवस त्यांचे निवासी प्रशिक्षण होणार आहे. प्रशिक्षणात रेशीम शेतीविषयी तांत्रिक माहिती तसेच उद्योजकता विकास याबाबतीत मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्निल तायडे, संचालक बोईले, अशोक वडवळे, कर्मचारी आदी उपस्थित होते.

रेशीम शेतीचा स्वीकार करावा...

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा स्वीकार करून उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने प्रयत्नरत राहावे. येत्या ९ सप्टेंबरपर्यंत ग्रामीण उद्योजकता विकास संस्था येथे हे प्रशिक्षण सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. यावेळी रेशीम शेतीबाबत रमेश भवर, शीलवंत इंगोले, रंगनाथ जांबूतकर, रजनीश गुट्टे, तान्हाजी परघणे हे शेतकऱ्यांंना मार्गदर्शन करतील.

- स्वप्निल तायडे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी

फोटो २१

Web Title: 10 days training to farmers for silk farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.