जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार बालकांना मिळतोय पोषण आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:52 IST2021-02-05T07:52:35+5:302021-02-05T07:52:35+5:30
कोरोना स्थितीमुळे जिल्हा परिषदेसह खासगी व्यवस्थापनाच्या शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. आता २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यास ...

जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार बालकांना मिळतोय पोषण आहार
कोरोना स्थितीमुळे जिल्हा परिषदेसह खासगी व्यवस्थापनाच्या शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. आता २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी अद्याप जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या नसल्याच्या दिसून येत आहेत. कोरोनामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला तरी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यात येत होता. सध्याही शालेय पोषण आहार देण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात एकूण १ लाख ३३ हजार लाभार्थी विद्यार्थी आहेत. या मुलांना सुरुवातीला पोषण आहार म्हणून मूग, हरभरा, तांदूळ देण्यात आला. त्यानंतर तूरडाळ, मटकी, तांदूळ देण्यात आला. आता जिल्ह्यात पोषण आहार वाटपाचे काम सुरू असून सध्या मटकी, तांदूळ, मसूर डाळ देण्यात येत आहे. काही शाळेत केवळ तांदूळच वितरित करण्यात येत असल्याबाबत विचारणा केली असता अशी कुठलीही तक्रार आली नसल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना घरपोच आहार
शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यात येतो. हा आहार शाळेत शिजविला जात नसला तरी धान्य घरपोच देण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळेमार्फत धान्य वितरित करताना पालक व विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून फिजिकल डिस्टन्स अंतराचे पालन करत धान्य देण्यात येत असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.
प्राथमिक शिक्षण विभागाकडे नाही आकडेवारी
जिल्ह्यात १ लाख ३३ हजार शालेय पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत; मात्र जिल्ह्याचा कारभार पाहणाऱ्या शिक्षण विभागाकडे शालेय पोषण आहारासंदर्भात तालुकानिहाय आकडेवारीच उपलब्ध नाही. त्यातही शालेय पोषण आहारविषयक कामे तालुकास्तरावरून चालतात. शिवाय काही पदेही रिक्त आहेत.
जिल्ह्यातील पोषण आहार लाभार्थी
१३३०००