लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर/वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील भोशी शिवारातील शेतातील सोयाबीन विना संमतीने चोरून नेले. ६६ क्विंटल एवढे सोयाबीन ज्याची किंमत एक लाख ३२ हजार रुपये हे चोरून नेल्या प्रकरणी चार जणांविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कळमनुरी तालुक्यातील भोसी शिवरामधील अजित गोविंद जिल्हेवार यांच्या शेतात लावलेले सोयाबीन विना परवाना व संमती न घेता शेतातून चोरून नेले.आरोपींनी संगनमत करून शेतातील ६६ क्विंटल सोयाबीन ज्याची किंमत एक लाख ३२ हजार एवढी आहे ते चोरून नेले.दिनांक ३० सप्टेंबर रोजी रात्री साडे अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास व दिनांक २ आॅक्टोबर रोजी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास हे सोयाबीन चोरीची ही घटना घडली.याप्रकरणी बालाजी घनश्याम भास्करे, (रा. आनंद नगर, नांदेड) यांच्या फिर्यादीवरून धोंडबा राघोजी राऊत, शंकर गंगाराम राऊत, मारुती विश्वनाथ राऊत, अमोल विठ्ठल राऊत ( सर्व राहणार भोशी) यांच्याविरुद्ध भा .दं .वि .च्या कलम ३७९,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर करीत आहेत.
शेतातील १ लाख ३२ हजारांचे सोयाबीन गेले चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:17 IST