१ लाख १० हजारांची सोन्याची चैन केली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:56 IST2021-02-05T07:56:18+5:302021-02-05T07:56:18+5:30

औंढा नागनाथः तीर्थक्षेत्र नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची माेठ्या संख्येने येत आहेत. या ठिकाणी आलेल्या एका भाविकांची साेन्याची चैन सापडल्याने पाेलिसांच्या ...

1 lakh 10 thousand gold chain returned | १ लाख १० हजारांची सोन्याची चैन केली परत

१ लाख १० हजारांची सोन्याची चैन केली परत

औंढा नागनाथः तीर्थक्षेत्र नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची माेठ्या संख्येने येत आहेत. या ठिकाणी आलेल्या एका भाविकांची साेन्याची चैन सापडल्याने पाेलिसांच्या मदतीने परत करत माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

२८ जानेवारी सकाळी ६ वाजता श्री नागनाथ प्रभूचे दर्शन घेऊन सकाळी ९ वाजता श्रीकृपा भक्तनिवास खाेली क्रमांक १०९ बंद करून चावी जमा केली. नंतर ते भक्त घृष्णेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी औरंगाबादकडे निघून गेले. यानंतर श्रीकृपा मंगल कार्यालयातील व्यवस्थापक विनायक गुहाडे यांनी सकाळी १० च्या सुमारास भक्तनिवासाच्या खाेल्याची पाहणी केली असता, या खाेलीत साेन्याची चैन दिसून आली. याची किमत अंदाजे किंमत १ लाख १० हजार रुपये आहे. त्यानंतर त्यांनी श्रीकृपा भक्‍तनिवासचे दीपक जवळेकर यांना सांगितले. रजिस्टरवर नोंद असलेले भक्त, नोंद असलेली खाेली क्रमांक १०९ मध्ये कोण राहिले, त्याची चौकशी केली. त्यामध्ये अरुण गोयल रा. अंबिकापूर छत्तीसगढ हे कुटुंब रात्रभर थांबले होते. यानंतर गोयल यांना संपर्क केला. त्यांना परत औंढा नागनाथ येथे बोलावून घेतले. त्यानंतर दुपारी २ च्या सुमारास अरुण गोयल यांना ती सोन्याची चैन परत केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे, गणेश राठोड, दीपक जवळेकर, विनायक गुहाडे, राहुल मोगले, मनोज जवळेकर, दिनकर तोंडे, द्वारकादास सारडा, त्र्यंबकराव कुटे, श्रीराम राठी, दत्ता शेगुकर, लक्ष्मण स्वामी, बाळू स्वामी आदी उपस्थित होते. फाेटाे नं. १५

Web Title: 1 lakh 10 thousand gold chain returned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.