शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

तीन अपघातांत १ ठार; ७ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:19 IST

तालुक्यात रविवारी सायंकाळच्या सुमारास विविध ठिकाणी तीन अपघात झाले. यामध्ये वगरवाडीनजीक झालेल्या अपघातामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यात रविवारी सायंकाळच्या सुमारास विविध ठिकाणी तीन अपघात झाले. यामध्ये वगरवाडीनजीक झालेल्या अपघातामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. इतर अपघातामध्ये ७ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर नांदेड व परभणी येथे उपचार सुरू आहेत.वगरवाडी येथील औंढा-परभणी या राज्य रस्त्यावर पिकअप-दुचाकीचा समोरासमोर सायंकाळी ५ वाजता अपघात झाला. यामध्ये पंजाबराव परसराम नवघरे (४०, पांग्री नवघरे ता.मालेगाव), रामराव धाबे (५२, धोंडगा बुद्रूक), विजय सदाशिव दवणे, गोविंदा सखाराम जाधव (दोघे रा.वाघीसिंगी ता.वसमत) हे गंभीर जखमी झाले होते. जखमींना उपचारार्थ केले होते; परंतु गंभीर मार लागल्याने सर्वांना हिंगोली येथे पाठविण्यात आले होते. यावेळी उपचारादरम्यान पंजाबराव परसराम नवघरे यांचा मृत्यू झाला आहे.खड्ड्यांमुळे अपघातजवळा बाजार येथून आठवडी बाजारातून गावाकडे परत येत असताना बबन नारायण कुटे (रा.साळणा ता.औंढा) यांची दुचाकी सायंकाळी ६ च्या सुमारास औंढा- जिंतूर रस्त्यावर असलेल्या गोळेगाव महाविद्यालयासमोर वाहन खड्ड्यांत गेल्याने नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.यामध्ये त्यांना गंभीर मार लागला आहे. त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत. राज्य रस्त्यावरील खड्ड्यांमुळेच हा अपघात झाला आहे.औंढा- पिंपळदरी दुचाकीच्या अपघातामध्ये शिवप्रसाद तुकाराम देवकर, सोनाजी तुकाराम मुकाडे, प्रमोद यादवराव खताळ हे तिघे गंभीर जखमी झाले आहे.सर्व जखमींवर वैद्यकीय अधीक्षक रमेश काळे यांनी उपचार केले.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस