(Image Credit : The Kewl Shop)
आपण नेहमीच बोलताना असं म्हणतो की, आताच्या भाज्यांमध्ये, फळांमध्ये केमिकल्स असतात त्यामुळे पुरेसे व्हिटॅमिन्स किंवा पौष्टिक तत्त्व शरीराला मिळत नाहीत. पण व्हिटॅमिनची शरीरात कमतरता झाली तर याची लक्षणे सहजपणे समजून येत नाहीत. काही लोक दिसायला फिट आणि निरोगी वाटतात, पण त्यांच्यातही व्हिटॅमिन्सची कमतरता असते. गेल्या वर्षांपासून मोठ्या प्रमाणात लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता आढळत आहे. भारतात तर ही समस्या अधिक बघायला मिळते.
नुकत्याच झालेल्या एका रिसर्चमध्ये असं आढळलं की, ३० ते ७० वयोगटातील लोक व्हिटॅमिनच्या कमतरतेचे शिकार होत आहेत. इंडिया सायन्स वायरमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, भारतात व्हिटॅमिन्सच्या कमतरतेचे शिकार झालेले लोक खूज जास्त आहेत. जास्तीत जास्त केसेसमध्ये लोक निरोगी दिसतात. त्यामुळे याची लक्षणे आढळून येत नाहीत.
या रिसर्चमध्ये २७० लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. रिसर्चमध्ये सहभागी जास्तीत जास्त लोक कोणत्या ना कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेचे शिकार होते. रिसर्चमध्ये १४७ पुरूष आणि १२३ महिलांचा समावेश करण्यात आला होता.
सर्वात जास्त व्हिटॅमिन्स बी १२ ची कमतरता आढळली. याचं मुख्य कारण हेही आहे की, शाकाहारी भोजनांमध्ये Vitamin B12 फार कमी आढळतं. हे व्हिटॅमिन जास्त मासे, अंडी आणि समुद्रात असणाऱ्या जीवांमध्ये असतं. भारतात Vitamin B12 ची समस्या सर्वात जास्त आहे. कारण भारतात जास्तीत जास्त लोक शाकाहारी असतात.
कोणत्या व्हिटॅमिन्सची सर्वात जास्त कमतरता
रिसर्चमधील आकडेवारीनुसार, ४६ टक्के लोकांमध्ये Vitamin B12 ची कमतरता आढळली. ३२ टक्के लोकांमध्ये फॉलेट अर्थात बी ९ ची कमतरता आढळली. त्यासोबतच २९ टक्के लोकांमद्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आढळली. शहरात राहणारे जास्तीत जास्त लोक उन्हात बाहेर निघत नाहीत. ज्यामुळे त्यांना पुरेसं व्हिटॅमिन डी मिळत नाही.
आयर्नचं प्रमाण आणि एनीमिया
शहरी लाइफस्टाइलमध्ये राहणाऱ्या महिला एनीमियाने ग्रस्त असतात. महिलांच्या शरीरात आयर्नची कमतरता असल्या कारणाने हीमोग्लोबिन तयार होत नाही. हीमोग्लोबिन कमी असल्याने एनीमिया रोग होतो. भारतात ६५ टक्क्यांपेक्षा अधिक महिला एनीमियाच्या शिकार आहेत.
व्हिटॅमिनची गरज कशी भागवाल?
जर तुम्हीही बाहेरून निरोगी दिसत असाल, पण लवकर थकवा येत असेल तर वेळीच टेस्ट करावी. व्हिटॅमिनची कमतरता जर सतत कमी होत गेली तर तुम्ही वेगवेगळ्या आजारांचे शिकार होऊ शकता. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा धोकाही यामुळे वाढतो.
१) जास्तीत जास्त चांगल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. जर तुम्ही शाकाहारी असाल तर Vitamin B12 साठी मोड आलेली कडधान्य, दूध, पनीर सारख्या पदार्थांचं सेवन करू शकता. हिरव्या भाज्यांसोबतच वेगवेगळी फळंही खावीत. याने शरीरातील वेगवेगळ्या व्हिटॅमिनचा गरज पूर्ण होते.
२) ड्रायफ्रूट्सचा आहारात समावेश करावा. जर तुम्ही चिकन किंवा मासे खात असाल तर आठवड्यातून कमीत कमी दोन दिवस खा.
३) सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची वेळ पाळा. नाश्त्यात मोड आलेली धान्य आणि दूध घ्या. याने जास्तीत जास्त व्हिटॅनिन्स मिळतात.