- मयूर पठाडेटेन्शन, टेन्शन, टेन्शन.. काय करायचं या टेन्शनचं?... या टेन्शनवरचा सर्वात सोप्प उपाय म्हणून आपल्याला सांगितलं जातं, योगा करा, ध्यान करा.. अगदी बरोबर. त्यामुळे आपल्यातील स्ट्रेस लेवल कमी होईल, आपलं टेन्शन कमी होईल हे अगदी नक्की.. पण मग त्यासाठी क्लास लावा, कोणीतरी समविचारी शोधा, त्यासाठीचे काही तास राखून ठेवा किंवा वेगळे काढा!.. कसं जमायचं हे? म्हणूनच अनेक जण त्याच्या वाटेला जात नाहीत...चिंतामुक्त आयुष्यासाठी तुम्ही त्या त्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे आणि त्या त्या क्षणात जगलं पाहिजे, हे तर खरंच, पण ते तर अगदी सहज शक्य आहे. त्यासाठी ना कुठल्या क्लासला जाण्याची गरज, ना खास वेळ काढण्याची गरज..खरं तर आपल्या प्रत्येक श्वासात, आपल्या प्रत्येक कृतीत ध्यान आहे, योगा आहे.. बस त्याकडे त्या क्षणापुरतं एकजीव व्हा. बाकी कुठल्याही गोष्टी सोडून त्या क्षणात रममाण व्हा आणि मग बघा.. खरा योग आणि खरं ध्यान त्यातच तर आहे..१- समजा, सकाळी उठल्यावर तुम्ही चहा पिताहात. घ्या त्या चहाचा अनुभव. अगदी शांतपणे. चहाची ती उबदार चव आपल्या जिभेवर रेंगाळते आहे, एक अनामिक एनर्जी आपल्यात संचारते आहे.. घ्या त्याचा अनुभव. फक्त त्या क्षणासाठी..२- मोबाईलवर संगीत चालू आहे. शिरू द्या, भिनू द्या ते संगीत शरीरात. त्या संगीताच्या नादाचे व्हायब्रेशन्स शरीराला जाणवू द्या..३- स्पर्शाचा अनुभव घ्या. स्वत:च स्वत:च्या शरीराला स्पश करा आणि अनुभवा ती जादू..४- साधं चालण्याची गोष्ट घ्या.. अगदी हळूहळू चाला. हळूवार श्वास घेताना पाऊल उचला. श्वास सोडताना पाऊलही खाली ठेवा.. कसली एवढी घाई आहे? फक्त पाच मिनिट.. जमेल?५- काही लिहायला बसला आहात.. अनुभवा पेनवरील बोटाचा दाब, पेनचा पेपरवरील दाब, पेनने लिहित असताना ऐका त्याचा खरडण्याचा आवाज. पेनमधून शाई झरतानाचा अनुभवा तो प्रभावीपणा..६- जेवायला बसला आहात. बोटांना जाणवू द्या, त्या खाद्यपदार्थातली ऊर्जा, त्याचं टेक्स्चर. श्वासात भरून घ्या त्याचा स्वाद.. राहा की त्या खाद्यपदार्थाबरोबर. जगा थोडा वेळ त्याच्याबरोबर.. फक्त दोन मिनिट..हेच ध्यान, हेच योगा आणि आपल्या तनमनाला व्यापून उरणारी हीच ती शांती. घ्या तिचा अनुभव..
हेच योगा, हेच ध्यान आणि तनमनाला व्यापून उरणारी हीच ती शांती!...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 15:54 IST
ऐका आपल्या जगण्याचा आवाज आणि व्हा टेन्शनमुक्त..
हेच योगा, हेच ध्यान आणि तनमनाला व्यापून उरणारी हीच ती शांती!...
ठळक मुद्देखाद्यपदार्थातली ऊर्जा जाणवू द्या आपल्या बोटांना.बघा आपल्याच त्वचेचा स्पर्श. शांतपणे.लिहिताना ऐका पेनच्या खरडण्याचा आवाज..चहाचा घोट. रेंगाळू द्या त्याला जिभेवर..