शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

हळद नेहमी खात असाल, पण तिचे आरोग्यदायी फायदे माहीत नसतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 11:48 IST

हळद तुम्हाला कॅन्सर, हृदयरोग, डायरिया, काविळ आणि सर्दी खोकला या आजारांपासून सुटका मिळवण्यातही फायदेशीर आहे.

हळद अनेक गंभीर आजारांवर रामबाण उपाय मानली जाते. हळद केवळ पदार्थांना रंग आणि चव देते असे नाहीतर आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. हळद तुम्हाला कॅन्सर, हृदयरोग, डायरिया, काविळ आणि सर्दी खोकला या आजारांपासून सुटका मिळवण्यातही फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया हळदीचे आरोग्यदायी फायदे...

1) अल्झायमरपासून बचाव

अल्झायमर डिमेन्शिया हा मेंदूशी संबंधित आजार आहे. या आजारात पेशंटची स्मरणशक्ती, विचार क्षमता, वागण्याची पद्धत, आकलन, व्यक्तिमत्त्व आणि आजूबाजूच्या परिसरातील माहिती जाणून घेण्याची क्षमता लोप पावत जाते. 

एन्नल ऑफ दी इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरॉलॉजीमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, हळद अल्झायमर रोखण्यासाठी आणि त्याच्यावरील उपचारासाठी फायद्याची आहे. हळदीमध्ये डायफरयूलॉयमेंथन (diferuloylmethan) तत्व असतात. 

2) कॅन्सर रोखण्यासाठी फायदेशीर

जर्नल ऑफ कॅन्सर रिसर्चमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, हळदीमध्ये कीमो-प्रोटेक्टिव गुण असतात आणि हे गुण तुम्हाला कोलोन कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, टी सेल ल्यूकेमिया, रेडिएशन ट्यूमर आणि ब्रेस्ट कॅन्सरपासून सुटका मिळवण्यात मदत करतं. 

3) डायबिटीज

हळदीमध्ये करकुमीन असतात. जे इन्सुलीन लेव्हल कंट्रोल करण्यात आणि डायबिटीजच्या औषधांचा प्रभाव वाढवण्यातही फायदेशीर असते. 

4) लिव्हर 

हळद खासकरुन दारू प्यायल्याने होणाऱ्या नुकसानापासून बचाव करते. जर्नल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, हळदीमुळे लीव्हरवर कोलेस्ट्रॉलचा होणारा नुकसानदायक प्रभाव कमी केला जातो. 

5) कोलेस्ट्रॉल

जर्नल ऑफ न्युट्रीशनल बायोकेमिस्ट्रीमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, नियमीतपणे हळदीचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होतात. 

6) गॅस आणि पोटदुखी

हळद पावडर गाळून ते पाण्यात मिश्रित करुन प्यायल्यास पोटदुखणे, पोट फुगणे यापासून आराम मिळतो. 

7) जखमा भरण्यासाठी

हळदीमध्ये फेनोलिक तत्व असतात, ज्यामुळे हळद जखमेवर लावल्यास जखम लगेच भरते. त्यासोबतच हळदीतील गुणकारी तत्वांमुळे इन्फेक्शन होत नाही. 

8) सर्दी-खोकला

हळदीतील काही खास गुणांमुळे सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. जर तुमच्या घशात खवखव असेल तर दूधात हळद मिश्रीत करुन घ्या.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य