तुम्ही पुरुष असा किंवा स्त्री, फिटनेसची त्रिसुत्री तुम्हाला माहीत आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 05:08 PM2017-11-29T17:08:39+5:302017-11-29T17:09:39+5:30

नुसताच घाम गाळून काय उपयोग होणार?

You may be a man or woman, do you know a trickster of fitness? | तुम्ही पुरुष असा किंवा स्त्री, फिटनेसची त्रिसुत्री तुम्हाला माहीत आहे?

तुम्ही पुरुष असा किंवा स्त्री, फिटनेसची त्रिसुत्री तुम्हाला माहीत आहे?

Next
ठळक मुद्देतरुण मुलांना विशेषत: आपले मसल्स डेव्हलप करायचे असतात, आपण ‘बॉडीबिल्डर’ दिसावं असं त्यांचं ध्येय असतं, तर महिलांचा फोकस असतो मुख्यत: वेटलॉस आणि फिगर मेन्टेन ठेवण्याकडे.कोणाचं ध्येय कोणतंही असो, पण कोणत्याही व्यायामाचा बेस मात्र एका त्रिसूत्रीवर आधारलेला असतो, तो म्हणजे कार्डिओ, स्ट्रेंग्थ आणि फ्लेक्जिबिलिटी!एकच एक प्रकारचा वर्कआऊट नुसता मोनोटोनसच होत नाही, तर त्याचा फार फायदाही तुम्हाला होत नाही.

- मयूर पठाडे

तुमचा फिटनेस प्लान काय आहे? म्हणजे स्वत:ला फिट ठेवण्यासाठी तुम्ही काय करता?.. अनेक जण अनेक गोष्टी करीत असतील, जिममध्ये घाम गाळण्यापासूस तर जॉगिंग ट्रॅकवर पळण्यापासून प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं अांणि आवडीनुसार फिटनेसचे प्रयोग करीत असतो. अनेकदा हे प्रयोग दुसºयाचे पाहूनही केलेले असतात. म्हणजे दुसरा जसं करेल, तसंच आपणही करीत असतो. काही वेळा हे प्रयोग मित्र मैत्रिणीचे पाहून असतात, तर काही वेळ यू ट्यूबवरच्या व्हीडीओंचं पारायण करून..
पण जे सूत्र दुसºयाला लागू पडतं, तेच आपल्यालाही लागू पडेल असंं नाही. आजकाल तर अनेक जिमही महिला आणि पुरुषांसाठी एकत्रच असतात. अशा ठिकाणीही तरुण मुलं करीत असलेला वर्कआऊट पाहून अनेक तरुणी, महिलाही तशाच प्रकारचा वर्कआऊट करायला बघतात.
पण एक गोष्ट प्रत्येकानं ध्यानात घेतली पाहिजे, ती म्हणजे प्रत्येकाचं ध्येय वेगळं असतं. त्यामुळेच त्यासाठीचा वर्कआऊटही वेगळा असतो. तरुण मुलांना विशेषत: आपले मसल्स डेव्हलप करायचे असतात, आपण ‘बॉडीबिल्डर’ दिसावं असं त्यांचं ध्येय असतं, तर महिलांचा फोकस असतो मुख्यत: वेटलॉस आणि फिगर मेन्टेन ठेवण्याकडे.
कोणाचं ध्येय कोणतंही असो, पण कोणत्याही व्यायामाचा बेस मात्र एका त्रिसूत्रीवर आधारलेला असतो. तो म्हणजे कार्डिओ, स्ट्रेंग्थ आणि फ्लेक्जिबिलिटी!
तुम्ही पुरुष असा, स्त्री असा, तुमचे गोल्स काहीही असू द्यात, पण या त्रिसूत्रीकडे प्रत्येकानं लक्ष द्यायलाच हवं. विशेषत: महिलांनी. कारण एकच एक प्रकारचा वर्कआऊट नुसता मोनोटोनसच होत नाही, तर त्याचा फार फायदाही तुम्हाला होत नाही.

Web Title: You may be a man or woman, do you know a trickster of fitness?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.