​आपणास माहिती आहेत का कांद्याचे आश्चर्यचकित फायदे !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2017 09:09 AM2017-01-25T09:09:11+5:302017-01-25T14:39:59+5:30

कांदा खाल्ल्याने उन्हाच्या झळांपासून होणाऱ्या आजारापासून बचाव होता, तसे याचे कित्येक फायदेही आहेत. चला मग जाणून घेऊयात अजून काय काय फायदे आहेत कांद्याचे.

You know that the amazing benefits of onion! | ​आपणास माहिती आहेत का कांद्याचे आश्चर्यचकित फायदे !

​आपणास माहिती आहेत का कांद्याचे आश्चर्यचकित फायदे !

Next
ंद्याशिवाय भाजीची मजा अपूर्णच आहे. उन्हाळ्यात तर कांदा खाण्याचा सल्लाही देण्यात येतो. उन्हाळ्यात कांदा खाल्ल्याने उन्हाच्या झळांपासून होणाऱ्या आजारापासून बचाव होता, तसे याचे कित्येक फायदेही आहेत. चला मग जाणून घेऊयात अजून काय काय फायदे आहेत कांद्याचे. 
कांदा आपल्या ह्रदयाचीही काळजी घेतो. कांद्यात असलेले अँटीआॅक्सिडेंट रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करते. याशिवाय ह्रदयात निर्माण होणाऱ्या अन्य समस्यांनाही समूळ नष्ट होतात. यासाठी आपल्या आहारात कांद्याचा समावेश असावाच. 

कांद्याचे त्वचेलाही फायदेशीर आहे. यातील अँटीआॅक्सिडेंटमुळे चेहऱ्यावर येणाऱ्या अकाली सुरकुत्यांपासून बचाव होतो. शरीरात रोग प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी विटॅमिन ‘सी’ची आवश्यकता असते आणि कांद्यातही विटॅमिन ‘सी’ आढळते. कांद्यात अशा काही सेल्स बनतात की ज्या प्राकृतिक रुपात इन्फेक्शन निर्माण करणाऱ्या एजंट्सना नष्ट करतात. मधुमेहावरदेखील कांद्याचे सेवन फायदेशीर आहे. कांद्यात आढळणारा क्वरसटिन मधुमेहाशिवाय ताण-तणावावरदेखील फायदेशीर आहे. पुरुषांमध्ये स्पर्मची मात्रा वाढविण्यासदेखील कांदा उपयुक्त आहे, म्हणून जेवणामध्ये कांद्याचा तडका अवश्य असावा.
 

Web Title: You know that the amazing benefits of onion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.