शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जास्त प्रमाणात जांभया येतात? केवळ थकवा नाही हे असू शकतात कारणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 09:44 IST

जांभई येणे तशी ही एक सामान्य बाब आहे. जांभईचा संबंध नेहमी झोप येणे किंवा थकवा जाणवणे याच्याशी जोडला जातो. कमी प्रमाणात जांभई याने गंभीर नाही.

जांभई येणे तशी ही एक सामान्य बाब आहे. जांभईचा संबंध नेहमी झोप येणे किंवा थकवा जाणवणे याच्याशी जोडला जातो. कमी प्रमाणात जांभई याने गंभीर नाही. पण जर हे प्रमाण जास्त असेल तर याची वेगवेगळी कारणे असू शकतात. मात्र जांभई येण्यामागे काही आजाराचे आणि शारिरीक समस्या वाढण्याचे संकेतही दिले जातात. म्हणूनच तुम्ही फारसे थकले नसाल तरीही जांभई येण्याचे प्रमाण वाढत असल्यास त्यामागे ही काही छुपी कारणं असण्याची शक्यता आहे.

थकवा किंवा झोप येत असल्यास जांभई येणे स्वाभाविक आहे. यामागील नेमके मेकॅनिझम ठाऊक नसले तरीही अशा वेळी जांभई येणे हे अगदीच नॉर्मल आहे. अपुर्‍या झोपेमुळे तुम्हांला वारंवार जांभई येऊ शकते. थकवा वाढल्याने मेंदूकडून आराम करण्याचा सल्ला दिला जातो. सध्याच्या तणावग्रस्त जीवनशैली हे अपुर्‍या झोपेचं कारण असू शकते. तसेच सेन्ट्रल स्लीप अ‍ॅप्निया, निद्रानाश यामुळे दिवसातही जांभई येण्याचे प्रमाण वाढू शकतं. 

काही औषधांचा दुष्परिणाम

आरोग्य विषयक काही समस्या वगळता औषधांच्या परिणामामुळे देखील मरगळ किंवा सुस्ती येऊ शकते. यामुळे जांभया येण्याचे प्रमाण वाढते. अ‍ॅन्टी डीप्रेसंट, काही पेनकिलर यांमुळे जांभई येऊ शकते.

ब्रेन ट्युमर / स्ट्रोक

मेंदूच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यास त्याचे संकेत दिले जातात परिणामी जांभई येते. जर्नल ऑफ न्युरोलॉजीच्या अहवालानुसार जांभई येणे हे मेंदूच्या कार्यामध्ये बिघाड असल्याचे लक्षण आहे. काही रुग्णांमध्ये जांभई येणे हे लक्षण त्यांच्या मेंदूतील नसांना झालेल्या प्रेशरमुळेही उद्भवते.

लिव्हरची समस्या

लिव्हर निकामी होण्याच्या अंतिम ट्प्प्यावर जांभया येण्याचे प्रमाण वाढते. थकव्यामुळेदेखील या आजारात जांभया येण्याचे प्रमाण  वाढते.

वेसोवेगल रिअ‍ॅक्शन

या आजारामध्ये वेगस नर्व्हचे कार्य बिघडल्यामुळे होते. ह्र्द्याजवळ रक्तप्रवाह होतो. हे हृद्यविकाराच्या झटक्यामध्ये आढळते. अपुरी झोप, थकवा नसतानादेखील जांभई येणे हे हृद्याचे आरोग्य बिघडल्याचे लक्षण आहे.

एपिलप्सी

एपिलप्सी ही एक कंडीशन असून मेंदूच्या काही भागाचे कायमस्वरूपी नुकसान झाल्याने त्याची निर्मिती होते. त्यामुळे मेंदूकडून दिल्या जाणार्‍या संकेतांपैकी एक म्हणजे जांभई ! त्यामुळे चाचणी करून त्याचे निदान करणे अधिक फायदेशीर ठरते. प्रामुख्याने मेंदूचे कार्य  मंदावल्याने हा जांभईचे प्रमाण वाढते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य