शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

World Tuberculosis Day 2022 : टीबीच्या या सामान्य लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, वाढू शकतो धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 11:18 IST

World Tuberculosis Day 2022 : हळूहळू याचा प्रभाव मेंदू आणि पाठीचा कणा यांसारख्या अवयवांवरही होऊ शकतो. हा आजार मायकोबॅक्टीरिअम ट्यूबरक्लोसिस नावाच्या एका बॅक्टेरियामुळे होतो.

जगभरात दरवर्षी २४ मार्चला वर्ल्ड ट्यूबरक्लोसिस डे (World Tuberculosis Day 2022) म्हणजे टीबी दिवस पाळला जातो. हा पाळण्यामागचं कारण टीबी या आजाराबाबत लोकांना जागरूक करणं हे  आङे. जगभरात कोट्यावधी लोकांना टीबी हा आजार आहे. हे एक गंभीर बॅक्टेरिअल संक्रमण आहे जे फुप्फुसावर प्रभाव टाकतं. हळूहळू याचा प्रभाव मेंदू आणि पाठीचा कणा यांसारख्या अवयवांवरही होऊ शकतो. हा आजार मायकोबॅक्टीरिअम ट्यूबरक्लोसिस नावाच्या एका बॅक्टेरियामुळे होतो.

टीबीची लक्षणं

- टीबीच्या सर्वात सामान्य लक्षणामध्ये खोकला हे एक आहे. हा खोकला बरेच दिवस राहतो. २ ते ३ आठवड्यांपेक्षा जास्त हा खोकला राहतो. टीबी होणारा खोकला हा कोरडा नसतो यात लाळ आणि कफसोबत निघतो.

- खोकल्यानंतर रक्त येणे

- छातीत दुखणं किंवा श्वास घेताना दुखणं

- वेगाने वजन कमी होणे

- फार जास्त थकवा

- ताप

- रात्री झोपेत खूप घाम येणं

- थंडी वाजणे

- भूक न लागणे

काय असतो टीबी?

टीबीने संक्रमित व्यक्ती जेव्हा खोकतो, हसतो किंवा शिंकतो तेव्हा मायकोबॅक्टेरिअम ट्यूबरक्लोसिस बॅक्टेरिा हवेच्या माध्यमातून एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत जातो. ज्याने टीबी होतो. एक्सपर्ट्सनुसार, बॅक्टेरिया फार सहजपणे पसरतात, तरीही टीबी होणं इतकं सहज नाही. सामान्यपणे यात फुप्फुसं प्रभावित होता. पण त्याशिवाय यात लिम्फ ग्रंथी, पोट, पाठ, सांधे आणि शरीराचे इतरही काही अवयव प्रभावित होतात.

कोणत्या लोकांना जास्त धोका?

जर तुम्ही एखाद्या मित्राला किंवा सहकाऱ्याला अॅक्टिव टीबी असेल तर तुम्ही संक्रमित होण्याची पूर्ण शक्यता असते. रशिया, आफ्रिका, पूर्व यूरोप, आशिया, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियनसारख्या क्षेत्रात राहणारे किंवा प्रवास केलेल्या लोकांना याची शक्यता जास्त असते. कारण इथे टीबी अधिक आहे. HIV संक्रमित लोक, बेघर किंवा तुरूंगात राहणारे कैदी किंवा इंजेक्शनच्या माध्यमातून ड्रग्स घेणारे लोक यांना टीबी होण्याचा धोका अधिक असतो. टीबी रूग्णांवर उपचार करणारे हेल्थ वर्करही याचे शिकार होऊ शकतात. स्मोकिंग करणाऱ्या लोकांना टीबी आजार होण्याचा धोका जास्त असतो.

काय आहेत उपचार?

हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, टीबीची लक्षणं दिसली तर लगेच यावर उपचार सुरू करावे. जे लोक याकडे दुर्लक्ष करतात त्यांची स्थिती आणखी गंभीर होत जाते. याची लक्षणे दिसली तर लगेच डॉक्टरांना संपर्क करा. सामान्यपणे ६ महिन्यांच्या कोर्सनंतर यावर उपचार केले जाऊ शकतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य