शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

World liver day 2022: तुमच्या लिव्हरचे आरोग्य जपण्यासाठी टाळा 'या' चूका, अन् करा हे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 15:38 IST

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती, पचन आणि चयापचय योग्यरित्या होण्यास यकृत महत्त्वाचे कार्य करते. आज खराब जीवनशैली, चुकीचा आहार, मद्यपान, लठ्ठपणा, हिपॅटायटीस बी, सी इत्यादींचा यकृतावर विपरीत परिणाम होऊन यकृताशी संबंधित अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढतो. 'जागतिक यकृत दिन २०२२ निमित्त जाणून घेऊया यकृत निरोगी ठेवण्यासाठी काय करायला हवे.

आज 'जागतिक यकृत दिन' (World Liver Day 2022) आहे. दरवर्षी 19 एप्रिल हा दिवस जागतिक यकृत दिन म्हणून साजरा केला जातो. शरीराच्या एकूण आरोग्यामध्ये यकृताच्या भूमिकेबद्दल माहिती आणि लोकांना यकृताशी संबंधित आजार आणि परिस्थितींबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश आहे. मेंदूनंतर यकृत (Liver) हा शरीरातील दुसरा सर्वात मोठा आणि गुंतागुंतीचा अवयव आहे. यकृताद्वारे शरीरातील अनेक मुख्य कार्ये चालतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती, पचन आणि चयापचय योग्यरित्या होण्यास यकृत महत्त्वाचे कार्य करते. आज खराब जीवनशैली, चुकीचा आहार, मद्यपान, लठ्ठपणा, हिपॅटायटीस बी, सी इत्यादींचा यकृतावर विपरीत परिणाम होऊन यकृताशी संबंधित अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढतो. 'जागतिक यकृत दिन २०२२ निमित्त जाणून घेऊया यकृत निरोगी ठेवण्यासाठी काय करायला हवे.

यकृत निरोगी ठेवण्याचे उपाय 

  • यकृत निरोगी ठेवायचे असेल तर दररोज सकस आहार घ्या. त्यात हिरव्या पालेभाज्यांचा भरपूर समावेश करा. पालक, ब्रोकोलीसह हिरव्या पालेभाज्या चांगल्या प्रमाणात खा. या भाज्या शरीरात नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रिया करण्यास मदत करतात.
  • अक्रोड, एवोकॅडो आणि ऑलिव्ह ऑइल आहारात घ्या, कारण त्यात चांगले फॅट्स असतात, त्यामुळे यकृत निरोगी राहते.
  • निरोगी यकृतासाठी स्वत:ला हायड्रेटेड ठेवणे महत्त्वाचे आहे. पाणी नैसर्गिक डिटॉक्सिफायिंग एजंट म्हणून कार्य करते आणि यकृताला शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.
  • तुमच्या आहारात फळांचे प्रमाणही वाढवा. या व्यतिरिक्त, आहारात जीवनसत्त्वे समृद्ध फळांचा समावेश करा, विशेषत: लिंबूवर्गीय फळं खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, ज्यामुळे यकृत रोगांपासून वाचू शकते.
  • दिवसभर बैठे काम आरोग्यासाठी घातक आहे. निरोगी राहण्यासाठी, प्रत्येकाने दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे यकृताच्या आजारांचा धोकाही कमी होतो. फॅटी लिव्हरची समस्या देखील शरीरात कमी चरबीमुळे होत नाही. 

यकृत निरोगी ठेवण्यासाठी काय करावे, काय नाही?

  • जास्त प्रमाणात चॉकलेट, कँडी आणि सॉफ्ट ड्रिंक्स टाळा, कारण ते यकृत खराब करू शकतात. जास्त प्रमाणात लाल मांस खाणे टाळा, कारण त्यामुळे यकृत फॅटी बनते.
  • सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्सचे पदार्थ जास्त खाणं टाळलं पाहिजे. कारण ते शरीरासाठी खराब फॅट्स म्हणून ओळखले जातात. त्यात तळलेल्या पदार्थांचा समावेश होतो.
  • प्रक्रिया केलेले (Processed Food) अन्न पदार्थ खाणे टाळले पाहिजे. कारण या प्रकारच्या अन्नामध्ये उच्च ग्लायसेमिक निर्देशांक असतो, ज्यामुळे फॅटी यकृत होऊ शकते. याशिवाय हे पदार्थ शरीरातील साखरेची पातळी देखील वाढवतात.
  • अल्कोहोल घेणं यकृतासाठी सर्वात हानिकारक आहे. अल्कोहोल डिहाइड्रेटिंग एजंट म्हणून कार्य करतं, ज्यामुळे यकृताला शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणे कठीण होतं.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स