शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

World Kidney Day 2022: या ५ सवयी आजच सोडा, नाही तर किडनीचं होईल मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 12:22 IST

World Kidney Day : किडनी निरोगी ठेवणं आणि निरोगी ठेवण्यासाठी काही चुकीच्या सवयी बदलणं फार गरजेचं असतं. अशाच काही सवयी आज आम्ही तुम्हाला सांगणार  आहोत.

World Kidney Day : १० मार्चला वर्ल्ड किडनी डे (World Kidney Day) असतो. या दिवशी लोकांमध्ये किडनीसंबंधी आजारांबाबत जागरूक केलं जातं. किडनी आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक अवयव आहे. ज्याद्वारे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढले जातात. अशात किडनी निरोगी ठेवणं आणि निरोगी ठेवण्यासाठी काही चुकीच्या सवयी बदलणं फार गरजेचं असतं. अशाच काही सवयी आज आम्ही तुम्हाला सांगणार  आहोत.

१) जास्त गोड खाणं सोडा 

जर तुम्हाला जास्त गोड पदार्थ खाण्याची सवय असेल तर याने लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीससारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. आणि पुढे जाऊन या समस्यांचा किडनीवरही प्रभाव पडतो. त्यामुळे वेळीच सावध होऊन गोड पदार्थ कमी खाल्ले तर पुढे होणारा धोका कमी केला जाऊ शकतो.

२) स्मोकिंग

स्मोकिंग (Smoking) अनेक आजारांचं मूळ मानलं जातं. प्रत्येकांनाच माहीत आहे की, स्मोकिंग केल्याने कॅन्सर होतो. पण फार कमी लोकांना माहीत असेल की, धुम्रपान केल्याने लघवीतील प्रोटीनचं प्रमाण वाढतं ज्याने किडनीला नुकसान पोहोचतं.

३) पुरेशी झोप न घेणे

शरीराचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी चांगली आणि पुरेशी झोप घेणं फायदेशीर ठरतं. किडनीच्या आरोग्यासाठीही पुरेशी झोप घेणं फायदेशीर आहे. कारण स्लीपिंग सायकलचं किडनीच्या कार्याशी सरळ संबंध असतो. त्यामुळे पुरेशी झोप घ्या आणि किडनी निरोगी ठेवा.

४) मद्यसेवन

जे लोक नियमित जास्त प्रमाणात मद्येवन करतात त्यांना क्रोनिक किडनी डिजीज होण्याच्या धोका जास्त असतो. दारूने केवळ किडनीच नाही तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होता. कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर, लठ्ठपणा याही समस्या होतात. त्यामुळे मद्यसेवन बंद करा.

५) जास्त मीठ खाणं

जास्त मीठ म्हणजे सोडियमयुक्त जेवण केल्यान ब्लड प्रेशर खूप वाढतं. याने किनडीसंबंधी वेगवेगळ्या समस्या होण्याचा धोका असतो. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मिठाचं सेवन कमी करा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य