शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

World Heart Day :.... म्हणून आज जागतिक हृदय दिन साजरा केला जातो; जाणून घ्या हृदय विकारांची लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 16:00 IST

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू हृदयासंबंधी आजारांमुळे होतो. 

सप्टेंबर २९ ला  जागतिक हृदय दिन जगभरात साजरा केला जातो. जागतिक हृदय दिन हा कौटुंबिक, शासकीय, सामाजिक पातळीवर हृदयांच्या आरोग्यासंबंधी जनजागृती पसरवण्यासाठी साजरा केला जातो.  वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्यामते (CVD) धुम्रपान, डायबिटीस, उच्च रक्तदाब,  लठ्ठपणा, प्रदुषण यांमुळे हृदयासंबंधी आजार वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू हृदयासंबंधी आजारांमुळे होतो. 

जागतिक आरोग्य संघटनेनं  २०१३ मध्ये नॉन कम्युनेकेबल डिसीज नियंत्रणात आणण्यासाठी मोहीम सुरू केली होती. (CVD)  कार्डीओ वॅस्क्युलर डिसीज त्यातील महत्वाचा भाग होता. २०२५ पर्यंत  (CVD) मुळे वाढणारा मृत्यूदर  २५ टक्क्यांनी कमी करणं हे त्या मागचं उद्दिष्ट  होतं.  हृदयाच्या आजारांमुळे वाढणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस  साजरा केला जातो. आज आम्ही तुम्हाला हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी कोणती लक्षणं दिसतात. याबाबत सांगणार आहोत.

कोणताही अटॅक मेंदूचा असो किंवा हार्टचा अचानक येत असतो. काही आठवडे आधी शरीरात बदल दिसून येतात. चालताना छाती खूप जास्त हेवी झाल्यासारखी वाटते.  त्याला एंजायना पेन असं सुद्धा म्हणतात. छाती जड झाल्यासारखी वाटणं हे हृदयाच्या आजारांचे मोठं लक्षण आहे. कोणताही अटॅक मेंदूचा असो किंवा हार्टचा अचानक येत असतो. काही आठवडे आधी शरीरात बदल दिसून येतात. चालताना छाती खूप जास्त हेवी झाल्यासारखी वाटते.  त्याला एंजायना पेन असं सुद्धा म्हणतात. छाती जड झाल्यासारखी वाटणं हे हृदयाच्या आजारांचे मोठं लक्षण आहे.

अचानक श्वास घ्यायला त्रास होतो. चालताना, जिने चढताना- उतरताना दम लागतो. या समस्येकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करता कामा नये अनेकदा घश्यात जळजळ सुद्धा होत असते. काहीही खाताना जळजळीचा सामना करावा लागतो. काहीही खाल्यानंतर अशी समस्या जाणवत असेल तर हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. याशिवाय  काहीही खाल्यानंतर चालण्या फिरण्यास त्रास होणं, छातीत जळजळणं यामुळे हार्टचे इतर आजार उद्भवण्याची शक्यता असते.

चक्कर, उलटी, पोटाच्या समस्या उद्भवतात. सगळ्यात महत्वाचं लक्षणं म्हणजे विकनेस, थकवा खूप जाणवतो. या लक्षणांव्यतिरिक्त काही लोकांना डावा हात दुखण्याची समस्या उद्भवते. साधारणपणे चालताना ही समस्या वाढते. जर एखाद्या व्यक्तीला खूप जास्त खोकला कफची समस्या असून हाता-पायांना सूज येत असेल तर गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. 

अनेकाना कोणतेही शारीरिक श्रमाचे काम न करता घाम येण्याची समस्या जाणवते. महिलांमध्ये आणि पुरूषांमध्ये हार्ट अटॅकची कारणं वेगवेगळी असतात. मादक पदार्थांचे सेवन, लठ्ठपणा, आनुवांशिकता ही कारणं हार्ट अटॅकची असू शकतात. अशी लक्षणं दिसत असल्यास वेळीच तज्ञांशी संपर्क करून तपासणी करून घ्या.

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स