शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

World Heart Day: 30 वयानंतर या समस्या नाहीत सामान्य, जाणून घ्या लक्षणं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 16:07 IST

World Heart Day : डब्ल्यूएचओची आकडेवारी सांगते की, दरवर्षी साधारण 1 कोटी 79 लाख लोकांचा मृत्यू केवळ कार्डियोवस्कुलर डिजीजमुळे होतो.

World Heart Day : वर्ल्ड हार्ट डे दरवर्षी 29 सप्टेंबरला पाळला जातो. हृदयरोगाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरातील जास्तीत जास्त मृत्यू हृदयरोगांमुळे होतात. डब्ल्यूएचओची आकडेवारी सांगते की, दरवर्षी साधारण 1 कोटी 79 लाख लोकांचा मृत्यू केवळ कार्डियोवस्कुलर डिजीजमुळे होतो.

खाणं-पिणं आणि लाइफस्टाईलची काळजी न घेणं हृदयरोग आणि हार्ट अटॅकचं मुख्य कारण आहे. हे आजार इतके घातक झाले आहे की, 30 वयाच्या आजूबाजूलाच याची लक्षण दिसणं सुरू होतात. हे संकेत सामान्य वाटतात, पण ते दिसताच डॉक्टरांकडे जायला हवं.

1) छातीत वेदना

छातीत वेदना किंवा आखडलेपणा वाटणं सामान्य वाटतं, जे अॅसिडिटी, गॅस, अपचन यामुळेही होऊ शकतं. पण रोज यांचा सामना करणं सामान्य बाब नाही आहे. ब्रिटिश हार्ट फाउंडेशननुसार, हृदयरोग किंवा हार्ट अटॅकचं सगळ्यात जुनं लक्षण आहे. जे दिसले की, लगेच डॉक्टरांची मदत घ्यायला हवी.

2) जेवण केल्यावर न पचनं

जर जेवण पचवण्यात तुम्हाला समस्या होत असेल तर हेही हृदयरोगासंबंधी समस्या असू शकते. ब्रिटिश हार्ट फाउंडेशननुसार, पोटदुखी, पोटात जळजळ किंवा अपचन हृदय कमजोर होण्याकडे इशारा करतात. कारण हृदय, अन्ननलिका आणि पोट तिन्ही आजूबाजूला असतात. ज्यामुळे हृदय आणि पोटदुखीमध्ये अंतर करणं अवघड होतं.

3) सतत आजारी वाटणं

जर तुम्हाला सतत शरीराची स्थिती खराब वाटत असेल आणि आतून आजारी असल्यासारखं वाटत असेल तर हेही हार्ट डिजीजचं लक्षण असू शकतं. यादरम्यान सगळ्यात जास्त काळजी घेण्यासारखी बाब म्हणजे जर तुम्हाला रिकामं बसून असल्यावरही असं वाटत असेल तर हृदयात काहीतरी बिघाड असल्याचा धोका जास्त असू शकतो.

4) जास्त घाम येणे

एखादं काम करताना किंवा गरमीमुळे घाम येणं सामान्य आहे. पण जर शरीर सतत थंड राहत असेल आणि त्यासोबतच घाम व छातीत हलकी वेदना होत असेल तर ही चिंतेची बाब असू शकते.

5) श्वास गुदमरल्यासारखं वाटणे

हृदयात काही बिघाड असेल तर नेहमीच छातीतच वेदना होईल असं नाही, याचे संकेत घशातही दिसू शकतात. हृदरोगींना शर्टचं वरचं बटन लावल्यावर श्वास गुदमरल्यासारखा वाटू शकतो. जे एनजायनाचं मुख्य लक्षण आहे. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. 

हृदय खराब असल्याची लक्षण

6) हात आणि पायांमध्ये वेदना राहणं

7) जबडा किंवा पाठीमध्ये वेदना

8) टाचांमध्ये वेदना होणं

9) जास्त थकवा जाणवणं

10) असामान्य हार्टबिट

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHeart Attackहृदयविकाराचा झटकाHealth Tipsहेल्थ टिप्स