शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

World Diabetes Day :कुमारवयातच पडतोय मधुमेहाचा विळखा     

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 08:20 IST

मधुमेहाचा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आता या आजाराचा विळखा कुमारवयातच पडू लागल्याचे पुण्यातील एका अभ्यासातून समोर आले आहे.

राजानंद मोरे

पुणे : मधुमेहाचा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आता या आजाराचा विळखा कुमारवयातच पडू लागल्याचे पुण्यातील एका अभ्यासातून समोर आले आहे. त्यातही या वयातील मुलांपेक्षा मुलींमध्ये टाईप २ मुधमेहाचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. बदलत्या जीवनशैलीबरोबरच या आजाराच्या लक्षणांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे हे प्रमाण वाढत असल्याचा निष्कर्ष अभ्यासातून काढण्यात आला आहे. 

                     मागील काही वर्षांपासून भारतात मधुमेहग्रस्त रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामध्ये  बैठे काम असलेली जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे टाईप २ प्रकारचा मधुमेह होतो. भारतीयांमध्ये तो तुलनेने कमी वयोगटांत म्हणजे १८ ते ३० वर्षे या वयोगटात आढळून येत आहे. एका खासगी संस्थेने पुणे शहरातील त्यांच्याकडे आलेल्या १२ हजार १८२ जणांच्या मधुमेहाबाबतच्या माहितीचा अभ्यास केला. ही माहिती सप्टेंबर २०१७ ते आॅगस्ट २०१८ या कालावधीतील आहे. या अभ्यासानुसार २० वर्षांखालील दहा टक्के मुलींना मधुमेहाचा विळखा पडला आहे. तर तेवढ्याच मुली काठावर आहेत. त्यातुलनेत ८ टक्के मुले मधुमेहग्रस्त असून ५ टक्के काठावर आहेत. वयोगट वाढत गेल्यानंतर ही स्थिती उलटी झाली आहे. पुरूषांमध्ये तुलनेने मधुमेह अधिक आढळून आला आहे. 

                     मधुमेहाच्या रुग्णांपैकी नव्वद टक्के रुग्णांना दुसऱ्या  प्रकारचा मधुमेह असतो. हा मधुमेह प्रामुख्याने पन्नाशीनंतर होतो. पण बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयातही याची लक्षणे दिसू लागल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. ताणतणाव, बैठे काम असलेली जीवनशैली आणि लठ्ठपणा ही स्त्रियांमध्ये मधुमेह वाढण्याची काही प्रमुख कारणे आहेत. इंडस हेल्थ प्लसचे सह व्यवस्थापकीय संचालक अमोल नायकवडी म्हणाले, तरुण पिढीमध्ये उद्भवणाऱ्या मधुमेहाच्या वाढत्या संख्येमुळे या रोगासाठी कुठलेही सुरक्षित वय नाही हे दिसून येते. अल्पवयात होणाऱ्या  मधुमेहाची योग्य ती काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी उपचाराचे गंभीरपणे नियोजन केले पाहिजे. जीवनशैलीतील बदल, रोजचा व्यायाम, पोषक आहाराचे सेवन, तपासणी अशा याकडे दुर्लक्ष होऊ नये.  डोळ्यांचा  विकार बळावतोय 

मधुमेहामुळे डायबेटिक मॅक्युलर एडेमा (डीएमई) नावाचा डोळ्यांचा विकार बळावत आहे. रुग्णांतील जागृतीचा अभाव आणि या आजारांशी संबंधित उपचारांच्या माहिती बाबत अज्ञान हे त्यामागचे कारण आहे. मधुमेही युवकांनी दर ६ महिन्यांनी डोळे तपासणी करणे आवश्यक असते. सध्या उपलब्ध अद्ययावत उपचार पद्धतींव्दारे त्यावर नियंत्रण मिळवता येवू शकते.

( डॉ. नितीन प्रभुदेसाई, नेत्ररोगतज्ज्ञ)

टॅग्स :PuneपुणेdiabetesमधुमेहHealthआरोग्य