शहरं
Join us  
Trending Stories
1
Diwali Muhurat Trading 2025: शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
2
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
3
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
4
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
5
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
6
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
7
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
8
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
9
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
10
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
11
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
12
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
13
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
14
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
15
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
16
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
17
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
18
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
19
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
20
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...

जागतिक कर्करोग दिन : शरीरातील प्रतिकारशक्ती कर्करोगापासून ठेवते दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 13:14 IST

World Cancer Day : शरीरात आतडे, तोंड, जीभ, ओठ, घसा, स्वरयंत्र अशा  कर्करोगाच्या जागा आहेत.

ठळक मुद्देतज्ज्ञ डॉक्टरांचे मत : भारतात तोंडाच्या कर्करोगाचे सर्वाधिक रुग्णमहिलांच्या गर्भाशय आणि स्तन कर्करोगात वाढ महिलांनी वयाच्या ४० ते ५० वयोगटात या तपासण्या कराव्यात.महिलांनी स्तन कर्करोगापासून दूर राहण्यासाठी मॅमोग्राफी तपासणी करून घेणे गरजेचे

अतुल चिंचली-पुणे : सध्याच्या युगात पौष्टिक अन्न, हिरव्या पालेभाज्या, फळे खाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे प्रतिकारशक्तीही कमी झाली आहे. जंक फूड खाण्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. कर्करोग हा कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. पण शारीरिक तंदुरुस्तीसाठी उपयोगी असणारे पौष्टिक अन्नाचे सेवन आणि व्यायाम केला, तर आपली प्रतिकारशक्ती वाढून ती आपल्याला कर्करोगापासून दूर ठेवते, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.जागतिक कर्करोग दिनानिमित्त डॉक्टरांशी ‘लोकमत’ने याविषयी संवाद साधला. दरवर्षी भारतात सुमारे सात लाख लोकांना कर्करोगाची लागण होते. त्यामध्ये सुमारे चार लाख तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण असतात. तंबाखूसेवनाने सुमारे २ हजार बळी जातात. 

भारतातील सरकारी रुग्णालयाच्या २०१९ च्या आकडेवारीनुसार वर्षभरात सुमारे ४ लाख लोकांना तोंडाच्या कर्करोगाची लागण झाली आहे. सुमारे दोन लाख महिलांना स्तनकर्करोगाची लागण झाली आहे. सुमारे तीन लाख महिलांना गर्भाशय कर्करोगाची लागण झाली आहे.मानवी शरीरात कार्सिनोजीन नावाचा घटक असतो. काही लोकांमध्ये तो सक्रिय, तर काहींमध्ये तो निष्क्रिय असतो. हा घटक सक्रिय असणाऱ्या लोकांमध्ये कर्करोग होण्याची जास्त शक्यता असते. पण निष्क्रिय असणाऱ्या लोकांमध्ये कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. हा घटक सक्रिय असणाऱ्या लोकांनी तंबाखू खाल्ल्याने त्यांना लवकरच तोंडाचा कर्करोग होतो. कार्सिनोजीन  मानवी शरीरात सक्रिय असतो की निष्क्रिय, यावर संशोधन सुरू आहे. अद्याप त्यावर निष्कर्ष आलेला नाही.शरीरात आतडे, तोंड, जीभ, ओठ, घसा, स्वरयंत्र अशा कर्करोगाच्या जागा आहेत. महिलांच्या गर्भाशय आणि स्तन कर्करोगात वाढ होत असून पुरुषांनाही प्रोस्टेट कर्करोगाला सामोरे जावे लागत आहे. नागरिक मिसरी, तंबाखू, गुटखा, तपकीर, बिडी, सिगारेट, मावा, जर्दा, पानमसाला अशा सवयींमुळे तोंडाच्या कर्करोगाला बळी पडत आहेत. महिलांनी स्तन कर्करोगापासून दूर राहण्यासाठी मॅमोग्राफी तपासणी करून घेणे गरजेचे आहे. गर्भाशय कर्करोग होऊ नये, म्हणून पॅप स्मिअर तपासणी करून घ्यावी. महिलांनी वयाच्या ४० ते ५० वयोगटात या तपासण्या कराव्यात. पुरुषांनी प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये, म्हणून सोनोग्राफी तपासणी करावी.......आता तरुण मुलांमध्ये आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू खाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर कर्करोगाबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे गर्भवती महिलांनी तंबाखू खाणे टाळायला हवे. त्यामुळे बाळाला टीबी किंवा फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.- डॉ. मिलिंद भोई, समन्वयक, ध्यासपंथ कॅन्सर निवारण प्रकल्प, शेठ ताराचंद रुग्णालय.............मी २४ वर्षांचा असताना तंबाखू खाण्यास सुरुवात केली. मला वयाच्या ४७ व्या वर्षी कर्करोग झाल्याचे कळाले. कर्करोगावर उपचार घेत असताना अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत होते. तंबाखू हे आपले आयुष्य नाही. कर्करोगासारख्या आजारातून मुक्त होणे फारच अवघड असते. म्हणूनच सर्वांनी व्यसन न करता आयुष्य जगावे. या कर्करोगातून उपचार घेऊन मी बाहेर आलो आहे.   - किरण पाटील (नाव बदलले आहे) ...........* तोंडाच्या कर्करोगाची लक्षणेवारंवार तोंड येणे, लाळ गळणे, तिखट सहन न होणे, त्वचा काळी पडणे, आवाज घोगरा होणे, तोंडाची आग होणे, तोंडातील जखम भरून न येणे, तोंड उघडताना त्रास होणे.

* स्तन कर्करोगाची लक्षणेहाताला गाठ लागणे, दुखणे 

............

* गर्भाशय कर्करोगाची लक्षणे अनियमित मासिक पाळी, अतिरिक्त रक्तस्राव

टॅग्स :cancerकर्करोगWomenमहिलाHealthआरोग्यBreast Cancerस्तनाचा कर्करोग