शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
4
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
5
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
6
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
7
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
8
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
9
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
10
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
11
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
12
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
13
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
14
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
15
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
16
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
17
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
18
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
19
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
20
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?

जगणे एक कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 22:40 IST

मागच्या लेखात आपण पाहिलं की यश, संपत्ती + आनंद समाधान हवं असेल तर 'मी' ला तीनही बाजूंनी सतत प्रगत करावं लागतं . १) शरीर २) मन ३) आत्मा. आज आपण पाहू या धकाधकीच्या जीवनात हे कसं साधायचं !!!

-  डाॅ.अरुणा तिजारे 

मागच्या लेखात आपण पाहिलं की यश, संपत्ती + आनंद समाधान हवं असेल तर 'मी' ला तीनही बाजूंनी सतत प्रगत करावं लागतं . १) शरीर २) मन ३) आत्मा. आज आपण पाहू या धकाधकीच्या जीवनात हे कसं साधायचं !!!जर जीवन एक महासागर आहे असं समजलं तर 'मी' एका जहाज सारखा आहे . या जहाजाला जर सुखरूप योग्य पैलतीराला पोहचायचं असेल तर प्राथमिक ३ गरजा  आहेत . १. जहाज मजबूत असायला हवं  (मनोबल )२. योग्य दिशा ठरवायला हवी (या साठी आत्मिक बल किंवा योग्य अयोग्य समजण्याचा विवेक असावा लागतो )३. शीड- त्या दिशेने प्रत्येक पाऊल उचलायला हवं ( प्रत्यक्ष कर्म )ह्या तीनही गोष्टींचा समतोल साधला कि जीवन आपोआपच एक सुंदर आकार घ्यायला लागतं आणि लोकांचा मात्र समज होतो कीं हे लोक लकी आहेत वरच्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आला आलं असेल कि मानसिक विकास हा सगळ्यात महत्वाची जागा घेतो . आपल्या आजूबाजूला पाहिलं तर ह्या पहिल्या पायरीचीच जास्त कमतरता दिसते बऱ्याच वर्षांपूर्वी उपनिषदांमधील एक गोष्ट वाचनात आली . आणि त्या नंतर माझं संपूर्ण जीवन परिवर्तित व्हायला सुरवात झाली. फक्त या गोष्टीवर मनन केलत तरी तुमचं जीवन योग्य दिशेने बदलायला सुरवात होते. गोष्ट अशीएका घनदाट जंगलात एकदा एक सिंहीण आपल्या छाव्याला जन्म देते आणि तिथेच गतप्राण होते. चव तिला उठवायचा प्रयत्न करत असतो . काही शेळ्या , मेंढ्या झाडाच्या मागून हे दृश्य पाहत असतात . त्यांच्या लक्षात सगळा प्रकार येतो . त्यांना त्या अनाथ चाव्याची दया येते ते त्याला त्यांच्या बरोबर त्यांच्या काळपट घेऊन जातात .आता हा सिंहाचा छावा शेळ्या मेंढ्यांमध्ये लाडाकोडात वाढायला लागतो . आपल्या सवंगड्यांबरोबर हा हाडाचा पाला , गवत खायला शिकतो . त्यांच्या बरोबर मोठ्या प्राण्यांपासून स्वतःच संरक्षण कसं करायचं ते शिकतो . त्याचबरोबर त्यांची भाषा म्हणजे 'में में ' करायला शिकतो . जीवनात कुठलीच समस्या नसते . बरीच वर्ष लोटतात आता हा छावा शरीराने पूर्ण सिंह बनतो . पण मनाने मात्र शैलीच असतो .एक दिवस हा एकटाच तलावाकाठी पाणी प्यायला जातो. त्याला मागून एक सिंह तिथे येतांना दिसतो . ह्याच्या बरोबर ह्याचा कळप नसतो. तो भीतीने में में करत पाळायला सुरवात करतो. खरं म्हणजे त्या दुसऱ्या सिंहाचं आत्तापर्यंत याच्या कडे लक्ष सुद्धा नसतं . पण याला पळतांना पाहून तो अचंब्यात पडतो . हा घाबरला का? पळतोय का? आणि सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे में में का करतोय? शेवट सिंहाच्या इज्जतीचा प्रश्न होता!!!!ह्या दुसऱ्या सिन्हांनी धावत जाऊन त्याला पकडला आणि विचारलं कि तू मला का घाबरतोस? पळतोय का? आणि में में का करतोस? तू पण सिंह आहेस मी पण सिंह आहे . मी या जंगलचा राजा आहे तसाच तू पण जंगलाचा राजा आहेस . शेळी सिंह बिचारा थरथत होता. तो म्हणाला असें मी सिंह किंवा जंगलचा राजा पण आत्ता तू मला जाऊदे . सिंहली कळेना या  बिचाऱ्याला कसं पाठवावं . शेवटी त्याने एक युक्ती केली . त्याला फरफटत तलावापाशी आणलं. मग दोन्ही प्रतिबिंब दाखवून म्हणाला 'नीट बघ मी सिंह आहे तसाच तू पण सिंह आहेस" या प्रतिबिंबाकडे आश्चर्याने पाहता पाहता साक्षात्कार झाला आणि हा शेळी सिंह पूर्ण पालटला . एक मोठी गर्जना करून तो त्या सिंहाबरोबर आपल्या योग्य स्थानी परतला.या गोष्टीतील हा सिंह आधी सुद्धा सिंहच होता आता सुद्धा सिंहच आहे. आधीही तो जंगलचा राजा होता आताही तो जंगलचा राजा आहे. मग बदललं काय? सगळंच !!! स्वतःची ओळख नव्हती तेव्हा एक भित्री शेळी होता . हे जंगल त्याच्यासाठी एक भीतीदायक जागा होती . पण आता मात्र तो एक बलवान सिंह आहे हे जंगल त्याचंच राज्य आहे. माणसाचाही असच असतं . आपल्याही आत हा सिंह- खरा मी दडलेला असतो. स्व ची ओळख विसरलेला . नकारात्मक मानसिकते मुळे शेळी झालेला. या खऱ्या मी ला बाहेर काढणं हेच आपली जीवनाचं उद्दिष्ट असतं.  मग शेळी बनून जगण्याची कसरत न करता, सिंह बनून राज्य करता येत.  अर्थात यश, समृद्धी,+ आनंद , समाधान यांचा समतोल सहज साधता येतो . हि ओळख कशी करायची हेच तर या लेखमालेचा उद्दिष्ट आहे .  so stay tuned…….