महागड्या क्रिम्सना करा बाय बाय; स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी 'हे' स्वस्त उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 11:15 AM2019-07-30T11:15:18+5:302019-07-30T13:54:20+5:30

शरीरावरील स्ट्रेच मार्क्समुळे हवे तसे कपडे घालायला मिळत नाहीत, अशी अनेकांची प्रामुख्याने तक्रार असते. गर्भावस्थेनंतर महिलांना स्ट्रेच मार्क्सच्या समस्येचा सामना करावा लागतो.

womens health tipsstretch marks causes risk factors symptoms treatment home remedies removal cream | महागड्या क्रिम्सना करा बाय बाय; स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी 'हे' स्वस्त उपाय

महागड्या क्रिम्सना करा बाय बाय; स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी 'हे' स्वस्त उपाय

Next

स्ट्रेच मार्क्स हे शरीरासाठी हानिकारक नसतात. मात्र शरीरावरील स्ट्रेच मार्क्समुळे हवे तसे कपडे घालायला मिळत नाहीत, अशी अनेकांची प्रामुख्याने तक्रार असते. गर्भावस्थेनंतर महिलांना स्ट्रेच मार्क्सच्या समस्येचा सामना करावा लागतो. पोट, पाठ, छाती आणि हातांवर स्ट्रेच मार्क येतात. अचानक वजन वाढल्यामुळे आणि कमी झाल्याने तसेच टीनएजर्समध्ये होणाऱ्या हार्मोन चेंजेंसमुळेदेखील स्ट्रेच मार्क्स येतात. महिला आणि तरूणींना तर हमखास स्ट्रेच मार्क्सच्या समस्यांना सामोरे जावे . 

स्ट्रेच मार्क्ससाठी अनेक उपचार आहेत, मात्र ते पूर्णतः गायब होत नाहीत. लेझर ट्रिटमेंटसोबत ट्रेटिनोईन आधारित क्रीम, जेल आणि लोशनच्या मदतीनं स्ट्रेच मार्क कमी होण्यास मदत मिळू शकते. स्ट्रेच मार्क्स येऊ नयेत, यासाठी खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल करावा. वजन नियंत्रणात राहील अशा जीवनशैलीचे अनुसरण करावे. गर्भवती महिलांनी अधिकाअधिक पाणी प्यावे. नियमित व्यायाम करावा. तेलकट त्वचेऐवजी कोरड्या त्वचेवर लवकर स्ट्रेच मार्कची समस्या निर्माण होते. आपल्या डॉक्टरांना भेटून त्यांच्या सल्ल्यानुसार डाएट फॉलो करावा.

व्हिटॅमिन ई

व्हिटॅमिन ई ला ब्यूटी व्हिटॅमिन असं देखील म्हटलं जातं. डॅमेज स्किन सेल्स रिपेअर करून स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी व्हिटॅमिन ई फायदेशीर ठरतं. त्यामुळे आपल्या आहारामध्ये बदाम पालक यांचा समावेश करा कारण यामध्ये व्हिटॅमिन ई चे प्रमाण हे अधिक असते.

 व्हिटॅमिन ए

व्हिटॅमिन ए शरीरासाठी फायदेशीर असल्याने आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन ए चा समावेश करा. गाजर, फिशमध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण हे अधिक असते. 

व्हिटॅमिन सी

स्ट्रेच मार्क्सच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर आहारात व्हिटॅमिन सी चा समावेश नक्की करा. लिंबू, आवळा, संत्र, द्राक्ष खा. 

व्हिटॅमिन के

व्हिटॅमिन के बाबत फार कमी लोकांना माहीत आहे. मात्र त्याचा देखील आहारात समावेश करणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन के हे स्ट्रेच मार्क्स हटवण्यासोबतच डार्क सर्कल्सही दूर करतात. 

नियमितपणे व्यायाम केल्याने शरीरासंदर्भातील अनेक तक्रारी दूर होतात. लठ्ठपणामुळे देखील स्ट्रेच मार्क्सची समस्या उद्भवते. त्यामुळे व्यायाम केल्याने लठ्ठपणावर नियंत्रण मिळवता येते आणि स्ट्रेच मार्क्सवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही, त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

 

Web Title: womens health tipsstretch marks causes risk factors symptoms treatment home remedies removal cream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.