शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

'या' कारणामुळे महिलांमध्ये वाढतीये डिप्रेशनची समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 11:26 IST

सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वत:साठी वेळच काढू शकत नाहीत. पुढे जाण्याच्या स्पर्धेत आपण मागे राहू नये म्हणून अनेकजण ऑफिसमध्ये ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काम करतात.

(Image Credit : www.shrm.org)

सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वत:साठी वेळच काढू शकत नाहीत. पुढे जाण्याच्या स्पर्धेत आपण मागे राहू नये म्हणून अनेकजण ऑफिसमध्ये ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काम करतात. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, ज्या महिला ९ तास किंवा त्यापेक्षा जास्त काम करतात त्यांना डिप्रेशनचा धोका अधिक असतो. 

जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजी अ‍ॅन्ड कम्युनिटी हेल्थमध्ये प्रकाशित या रिसर्चनुसार, ज्या महिला एका आठवड्यात ५५ तासांपेक्षा जास्त काम करतात त्यांना डिप्रेशनचा धोका ७.३ टक्क्यांनी जास्त वाढतो. तेच जर महिलांनी एका आठवड्यात ३५ ते ४० तास काम केलं तर त्या फिट आणि तणावमुक्त राहतात. 

या रिसर्चचे मुख्य गिल वेस्टन सांगतात की, 'आम्ही आमच्या रिसर्चचे परिणाम फार जास्त विस्तारात तर नाही सांगू शकत. पण आम्हाला आढळलं की, महिला केवळ त्यांच्या ऑफिसमध्येच काम करतात असं नाही तर त्यांना घरातीलही कामे करावी लागतात. त्यामुळे त्यांचे काम करण्याचे तास वाढतात'.

या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, ज्या महिला विकेंडला सुद्धा काम करतात, त्या जास्त सर्व्हिस सेक्टरमधील असतात आणि त्यांचा पगारही इतरांच्या तुलनेत कमी असतो. अर्थातच पगार कमी असेल तर व्यक्तीवरील तणाव वाढतो आणि नंतर त्या डिप्रेशनच्या शिकार होतात. हा रिसर्च करण्यासाठी ११ हजार २१५ पुरूष आणि १२ हजार १८८ महिलांचा समावेश करण्यात आला होता. रिसर्चनुसार, विकेंडला काम करावं लागत असल्याने पुरूष आणि महिला दोघांमध्येही डिप्रेशन येतं. पण महिलांचं डिप्रेशन हे ४.६ टक्क्यांनी जास्त असतं. 

याबाबतचे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची आकडेवारी सुद्धा फार उत्साहजनक नाहीये. या आकडेवारीनुसार, ३०० मिलियनपेक्षा जास्त लोक डिप्रेशनने पीडित आहेत. २०१६ ते १७ दरम्यान एकट्या भारतात ३६ टक्के लोक डिप्रेशनने ग्रस्त होते. तसेच हे प्रमाण कामाच्या वाढत्या ताणामुळे अधिक वाढताना दिसत आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यResearchसंशोधनWomenमहिला