मनोरुग्णालयातील महिला रुग्ण असुरक्षित!
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:11+5:302015-02-13T00:38:11+5:30
मनोरुग्णालयातील महिला रुग्ण असुरक्षित!

मनोरुग्णालयातील महिला रुग्ण असुरक्षित!
म ोरुग्णालयातील महिला रुग्ण असुरक्षित!- कमी उंचीच्या भिंतीमुळे असामाजिक तत्त्वांचा प्रवेश : पोलीस ठाण्यात तक्रार दाखलनागपूर : शासकीय मनोरुग्णालयातील महिला रुग्ण असुरक्षित असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी महिला रुग्ण विभागाच्या मागील परिसरातील संरक्षण भिंतीवरून दोन समाजविघातक परिसरात शिरले होते. या संदर्भाची तक्रार रुग्णालय प्रशासनाने गिट्टीखदान पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. शासकीय मनोरुग्णालय ५४ एकर परिसरात पसरलेले आहे. यातील १० एकर जागेत महिला विभाग आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या वेळी दोन समाजविघातक महिला विभागाच्या मागील सुरक्षा भिंतीवरून विभागाच्या आत आले. याच वेळी कर्तव्यावर असलेल्या काही अटेंडंटसना याची माहिती मिळताच त्यांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. यापूर्वीही या परिसरात चोऱ्या झाल्याची माहिती आहे. महिला विभागाची संरक्षण भिंंत कमी उंचीची आहे. याची उंची वाढविण्याचा प्रस्ताव २०१३ मध्ये पाठविण्यात आला होता. परंतु बांधकाम विभाग याला घेऊन गंभीर नसल्याचे दिसून येते. यासंदर्भात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुळशीराम धोटे यांना विचारले असता ते म्हणाले, रुग्णालयाच्या परिसरात समाजविघातक येत असल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदविली आहे. महिला रुग्ण विभागाच्या मागील परिसरातील संरक्षण भिंंतीची उंची ११ फुटावरून १५ फुटावर करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. याला मंजुरी मिळाल्यास बांधकाम सुरू होईल.