शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बापरे! पोटात दुखतंय म्हणून हॉस्पिटलला पोहचली महिला; डॉक्टरांनी तपासताच ११ दिवसांनी हात-पाय कापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 14:44 IST

३९ वर्षाची मोनिकाच्या पोटात होणाऱ्या वेदना पाहता डॉक्टरांनी तिची तपासणी केली. काही चाचण्याही करायला सांगितल्या.

ठळक मुद्देरक्त शरीरातील इतर भागांपर्यंत पोहचण्यास अडचण येत आहे. सुरुवातीला डॉक्टरांनी सांगितलेतिचे हाय-पाय कापल्याशिवाय पर्याय नाही. पहिल्यांचा त्यांना डावा पाय कापण्यात आला मोनिकासोबत जे काही झाले त्याला अनुवांशिक कारणही जबाबदार आहे. त्याच्या कुटुंबात अल्सरचा त्रास आहे.

नवी दिल्ली – अनेकदा आपण आयुष्यातील काही समस्यांकडे छोटी समजून दुर्लक्ष करतो. आरोग्याच्या बाबतीत तर ते हमखास घडतं. ही समस्या खरंच खूप मोठी असते. हंगरी इथं राहणाऱ्या एका महिलेसोबत नेमकं हाच प्रकार घडला. मोनिका नावाच्या या महिलेच्या पोटाजवळील खालच्या बाजूस अचानक प्रचंड वेदना होऊ लागल्या. या वेदना न सहन  झाल्याने तिने थेट हॉस्पिटल गाठलं. याठिकाणी डॉक्टरांनी तिला तपासलं असता जे काही समोर आलं त्यातून या महिलेचे संपूर्ण आयुष्यचं बदललं.

३९ वर्षाची मोनिकाच्या पोटात होणाऱ्या वेदना पाहता डॉक्टरांनी तिची तपासणी केली. काही चाचण्याही करायला सांगितल्या. या चाचणीचा रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी मोनिकाला सांगितले की, तुम्हाला सेप्सिसची समस्या जडली आहे. जी तुमच्या शरीराच्या इतर भागातही पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचे हात-पायही गमवावे लागू शकतात अशी भीती डॉक्टरांनी तिला बोलून दाखवली. तेव्हा मोनिकाच्या पायाखालची जमीन सरकली.

दुर्मिळ आजारानं आयुष्यचं उद्ध्वस्त

मोनिकाने Pecs Aktual या वेबसाईटशी संवाद साधताना सांगितले की, त्यांच्या हात आणि पायांवर वैस्कुलर ऑक्लुजन(Vascular Occlusion) नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. त्यामुळे तिच्या नसांमध्ये रक्त जमा झाले आहे. रक्त शरीरातील इतर भागांपर्यंत पोहचण्यास अडचण येत आहे. सुरुवातीला डॉक्टरांनी सांगितले की, हे ऑपरेशननंतर बरं होऊ शकतं परंतु त्यानंतर मोनिकाला म्हणाले की, तिचे हाय-पाय कापल्याशिवाय पर्याय नाही. पहिल्यांचा त्यांना डावा पाय कापण्यात आला त्यानंतर ७ दिवसांनी उजवा पाय कापला आणि पुन्हा ३ दिवसांनी डावा हात कापण्यास भाग पडलं. शरीरातील नसा ठीक करण्यासाठी दुसरा मार्ग नव्हता. त्यामुळे मोनिकाचे एका पाठोपाठ १६ ऑपरेशन करावे लागले. आणि केवळ उजव्या हाताच्या साहय्याने मोनिका तिचं काम करू शकते.

पायावर लागलेल्या जखमेनंतर समस्या सुरू

मोनिकासोबत जे काही झाले त्याला अनुवांशिक कारणही जबाबदार आहे. त्याच्या कुटुंबात अल्सरचा त्रास आहे. स्वत: मोनिकाला २ वर्षापूर्वी पायाला जखम झाली होती. ती अल्सरमध्ये बदलली. जेव्हापासून मोनिका रुग्णालयात उपचारासाठी आलीय तेव्हापासून पती आणि आईच तिची देखभाल करतात. आठवडाभर तिला घराच्या बाहेरच पडणं कठीण झालं होतं. मोनिकाचं संपूर्ण आयुष्य ३६० डीग्रीनं बदललं. जेव्हा ती पोटात वेदना असल्याची तक्रार घेऊन हॉस्पिटलला पोहचली तेव्हा तिला पुन्हा घरी असं परतावं लागेल याची साधी कल्पनाही कुणी केली नव्हती.

टॅग्स :doctorडॉक्टर