सात टक्के हृदय कार्यरत रुग्णावर वोक्हार्टमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया
By admin | Updated: May 5, 2014 20:56 IST
नाशिक : केवळ सात टक्के हृदय कार्यरत असणार्या ४१ वर्षीय रुग्णावर जोखीम पत्करत यशस्वी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे़ उत्तर महाराष्ट्रातील अशी ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा वोक्हार्टचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ़ राहुल कैचे व केंद्रप्रमुख डॉ़ अविनाश अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केला़
सात टक्के हृदय कार्यरत रुग्णावर वोक्हार्टमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया
नाशिक : केवळ सात टक्के हृदय कार्यरत असणार्या ४१ वर्षीय रुग्णावर जोखीम पत्करत यशस्वी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे़ उत्तर महाराष्ट्रातील अशी ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा वोक्हार्टचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ़ राहुल कैचे व केंद्रप्रमुख डॉ़ अविनाश अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केला़डॉ़ कैचे म्हणाले, सरासरी १५ टक्केच्या खाली हृदय कार्यरत असणार्या रुग्णांवर बायपास शस्त्रक्रिया करणे हे जोखीम पत्करण्यासारखे असते़ यामध्ये रुग्णाचे हृदय बंद पडणे, ठोके अनियमित होणे, किडनी फे ल होणे, मधुमेह असेल तर पक्षघात व संक्रमण असे अनेक धोके असतात़ यामुळे अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे इतर डॉक्टर टाळतात़ परंतु हे आव्हान स्वीकारत आपण ही शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली़ आत्मविश्वास व वोक्हार्टच्या अतिशय प्रशिक्षित सहकारी वर्गामुळे हे शक्य झाले, असेही ते म्हणाले. ज्या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली ते कल्याणचे जयेश छाया हे व्यावसायिक आहेत़ त्यांच्यावर ॲसिडिटी व पाठीचे दुखणे यावर महिनाभर मुंबईत उपचार सुरू होते; परंतु काहीच आराम पडत नव्हता. यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी नाशिक येथील एका नर्सिंग होममध्ये त्यांना आणले होते़ तेथे काही चाचण्या केल्यानंतर त्यांना हृदयरोगाचा झटका येऊन गेल्याचे निदान झाले़ त्यांच्या हृदयाची कार्यक्षमता सात टक्क्यांपेक्षाही कमी होती. अशा अवस्थेत वोक्हार्टमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे वय पाहता जोखीम पत्करत व शुद्ध रक्तवाहिन्यांचा वापर करत बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली़ सात दिवसांत सदर रुग्णास मुक्त करण्यात आले असून, प्रकृती एकदम ठीक असल्याचे शस्त्रक्रिया करण्यात आलेले रुग्ण जयेश छाया यांनी सांगितले़