शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

शक्तिवर्धक गोळ्या लागतात तरी कशाला, त्याची खरंच गरज असते का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 08:12 IST

गेल्या आठवड्यात या औषधांमुळे एकास प्राण गमवावे लागल्याची घटना घडली; तर अन्य एका घटनेत एकावर तातडीची शस्त्रक्रिया करावी लागली. अशा औषधांची खरंच गरज आहे का?

लैंगिकता, लैंगिक शिक्षण, लैंगिक समस्या आदी विषयांवर उघड चर्चा करणे आपल्याकडे अजूनही सभ्यतेचे लक्षण मानले जात नाही. अशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांकडे संशयित नजरेने पाहिले जाते. त्यामुळे यासंदर्भातील ज्ञान-अज्ञान यांच्यातील सीमारेषा धूसर राहात असते. परिणामी पुरेशा ज्ञानाअभावी अनेकांना लैंगिक समस्यांना सामोरे जावे लागले. लैंगिक क्षमता उत्तम म्हणजे पौरुषत्व असा खासा समज असतो. त्यामुळे आपले हे पौरुषत्व अबाधित राहावे किंबहुना अधिक वृद्धिंगत व्हावे, यासाठी लैंगिक शक्तिवर्धक गोळ्यांचा आधार घेतला जातो. मात्र, अशा गोळ्या-औषधांची खरंच गरज असते का, हे तपासून पाहणे आवश्यक ठरते. 

उत्तर प्रदेशातील एका तरुणाचा नुकताच विवाह झाला होता. मित्रांच्या सल्ल्यावरून त्याने लैंगिक क्षमता वाढविणारी औषधे घेतली. मात्र, त्याचे दुष्परिणाम झाल्याने संबंधित तरुणावर तातडीची शस्त्रक्रिया करावी लागली. तर गेल्या आठवड्यात कामोत्तेजक औषधे घेऊन संभोग करणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. नागपुरात ही घटना घडली. सद्यस्थितीत बाजारात लैंगिक क्षमता वाढविणाऱ्या औषधांनी हैदोस घातला आहे. नामांकित औषध कंपन्या विविध नावाने ही औषधे बाजारात आणत आहेत. अनेक कंपन्यांच्या जाहिरातीही एवढ्या कल्पक असतात की पाहणाऱ्याला वाटावे की हे औषध जणू आपल्यासाठीच बनवले आहे. त्यातही लैंगिक क्षमता वाढविणाऱ्या या गोळ्या-औषधांच्या विक्रीवर कोणाचेही नियंत्रण नाही. कुणीही यावे आणि औषध घेऊन जावे, अशी परिस्थिती आहे. 

पुरुषांप्रमाणेच महिला वर्गातही लैंगिक क्षमता वाढविणाऱ्या औषधांची क्रेझ आहे. ही औषधे घेण्यामध्ये महिला पुढाकार घेऊ लागल्या आहेत. पुरुषांमध्ये लैंगिक ताठरता आणि शीघ्र पतनाच्या लैंगिक तक्रारी असतात तद्वत महिलांमध्येही लैंगिक तक्रारी असतात. कामेच्छा कमी असणे, कामतृप्ती न होणे, अशा काही समस्या महिलांमध्ये आढळून येतात. औषधे घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - डाॅ. विजय दहिफळे, लैंगिक तज्ज्ञ  

टॅग्स :Healthआरोग्य