शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वय वाढले की झोप कमी का होते? माहिती आहे का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 05:51 IST

Health Tips: निसर्गात एक नियम आहे ईफ यू डोंट युज, यू लुज इट! जी गोष्ट (शरीरातील) वापरली जाणार नाही ती तुम्ही गमावता! आपल्या स्नायूंच्या बाबतीतदेखील हेच तंतोतंत लागू आहे.

- डॉ. अभिजित देशपांडे, (इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस iissreports@gmail.com)निसर्गात एक नियम आहे ईफ यू डोंट युज, यू लुज इट! जी गोष्ट (शरीरातील) वापरली जाणार नाही ती तुम्ही गमावता! आपल्या स्नायूंच्या बाबतीतदेखील हेच तंतोतंत लागू आहे. जसजसे वय वाढत जाते, तसतशी तुमच्या शरीरातील स्नायूंची संख्या कमी होते आणि ते संदेश पाठवायला लागतात की हे काम आमच्याने होणार नाही.  हे संदेश वाढायला लागले की आपोआपच  चिंतातुरपणा येऊ लागतो; आणि डोक्याची चिंता वाढली, की अन्य कुठलेही कारण नसताना झोपेवर परिणाम करणारच. वय वाढत गेले तशी चिंताही वाढत गेली, तर झोप कमी लागते, त्यामागे नेमके हेच कारण आहे! यात आपण एक लक्षात घेतले पाहिजे की चिंतेची पातळी ही त्या व्यक्तीकरिता विशिष्ट असते. म्हणजे दारासिंग बलभीम असल्याने त्याच्या चिंतेची पातळी कमी आणि तुम्ही सर्वसामान्य शरीरयष्टीचे असल्याने तुमची पातळी त्याच्यापेक्षा अधिक असे नाही. तर दारासिंगने त्याचे स्नायू गमावले असता त्याची वैयक्तिक चिंतेची पातळी वाढेल आणि तुमचे स्नायू वाढले तरी पातळी निश्चितच खाली येईल. गेल्या आठवड्यात आपण कारखाना मालकाचे जे रूपक वापरले, ते आठवून पाहा. एकेक कामगार कमी होत गेला, तसतसा वेळेत माल तयार करू शकण्याचा त्याचा आत्मविश्वास उणावत गेला, आणि मग त्याच्या चिंतेची पातळी वाढली... आणि अर्थातच झोपही उडाली. कामाची नवी व्यवस्था लावून उत्पादनाचा वेग वाढवणे, हा त्याच्या समस्येवरचा मार्ग होय! वयानुसार कमी होत जाणाऱ्या, हरवत चाललेल्या आपल्या झोपेचा प्रश्न हलका करण्याचा मार्गही नेमका हाच आहे :  स्नायूवर्धन करणे! मेंदूमध्ये छोट्या बदामाच्या आकाराचे दोन भाग असतात त्यांना ॲमीग्डाला असे म्हणतात. मेंदूकडून आपल्या स्नायूंना सूचना जातात हे माहिती आहेच; पण, स्नायूकडूनदेखील उपसूचना (फीडबॅक) मेंदूतील भागांना आणि या ॲमीग्डालाकडे दिल्या जातात, हे सिद्ध झालेले आहे.पाठीचा कणा ताठ झाला की आत्मविश्वास वाढतो हे चाचण्यांमध्ये दाखविण्यात आले आहे. संबंध हठयोग शास्त्रात स्नायू आणि सांधे यांच्या विशिष्ट अवस्थेमुळे आपण स्वभावात होणारे फरक यावर विवेचन आहे. आता हे स्नायूवर्धन कसे करावे? त्याबाबत पुढील लेखात विचार करूयात. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स