शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

नारळ पाणी रात्री प्यावे की नाही? जाणून घ्या एक्सपर्ट काय सांगतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 09:29 IST

Coconut Water : जर तुम्ही नारळ पाणी रात्री पित असाल तर याने काही नुकसानही होतात. नारळ पाणी रात्री प्यायल्याने काय काय नुकसान होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

Coconut Water : नारळाचं पाणी आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि अनेक गंभीर समस्यांचा धोका टाळण्यासाठी फार फायदेशीर ठरतं. उन्हाळ्यात लोक नारळाच्या पाण्याचं भरपूर सेवन करतात. यातून अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीराला मिळतात. पण हे फायदे शरीराला तेव्हाच मिळतात जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने त्याचं सेवन कराल. नारळ पाणी पिण्याची योग्य वेळही तुम्हाला माहीत असली पाहिजे. 

एक्सपर्टनुसार, नारळ पाणी पिण्याची सगळ्यात योग्य सकाळी आणि दुपारी आहे. पण जर तुम्ही नारळ पाणी रात्री पित असाल तर याने काही नुकसानही होतात. नारळ पाणी रात्री प्यायल्याने काय काय नुकसान होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. तसेच नारळ पाणी पिण्याची योग्य पद्धतही जाणून घेऊ.

जास्त लघवी लागणे

नारळ पाण्यात नॅचरल ड्यूरेटिक तत्व असतात. त्यामुळे रात्री नारळ पाण्याचं सेवन केल्याने तुम्हाला पुन्हा पुन्हा लघवीला जाण्याची समस्या होऊ शकते. याने तुमची झोपही खराब होते.

पचनासंबंधी समस्या

रात्री काही लोकांना नारळ पाण्यातील शुगर आणि इलेक्ट्रोलाइट्स पचवण्यास समस्या होऊ शकते. यामुळे पोट फुगणे, गॅस आणि पोटासंबंधी इतर समस्या होऊ शकतात. त्यामुळे रात्री नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे.

शुगर वाढू शकते

नारळ पाण्यात नॅचरल शुगर भरपूर असते. त्यामुळे रात्री नारळ पाणी प्यायल्याने काही लोकांमध्ये शुगरची लेव्हल वाढू शकते. खासकरून डायबिटीस असलेल्या लोकांनी रात्री नारळ पाणी पिऊ नये.

झोप येत नाही

नारळ पाण्यात भरपूर इलेक्ट्रोलाइट्स असतात. जे ऊर्जा वाढवतात. रात्री नारळ पाण्याचं सेवन केल्याने तुमच्यातील अॅक्टिवनेस वाढतो. ज्यामुळे झोप न येण्याची समस्या होऊ शकते.

अधिक हायड्रेशन

रात्री नारळ पाणी प्यायल्याने शरीरात अधिक हायड्रेशन होऊ शकतं. अधिक हायड्रेशनमुळे इलेक्ट्रोलाइटचं संतुलन बिघडतं. ज्यामुळे थकवा, मांसपेशींमध्ये वेदना आणि इतरही काही समस्या होऊ शकतात.

नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ

मनारळ पाणी रिकाम्या पोटी किंवा दुपारी पिणं अधिक चांगलं मानलं जातं. सकाळी रिकाम्या पोटी नारळाचं पाणी प्यायल्याने इम्यूनिटी बूस्ट होते. मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि वजन कमी करण्यासही मदत मिळते. त्याशिवाय डिहायड्रेशन आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. सकाळी नारळ पाणी प्याल तर हार्टबर्न, एसिडिटी आणि मॉर्निंग सिकनेस दूर होतं.

वर्कआउट करण्याआधी किंवा नंतर नारळ पाणी पिता येऊ शकतं. नारळ पाणी हे एक हायड्रेटिंग ड्रिंक आहे आणि शरीराला ऊर्जा देतं. अशात हे तुम्ही एनर्जी बूस्टिंग ड्रिंकसारखं पिऊ शकता.

दुपारच्या वेळ नारळ पाणी प्याल तर याने पचन क्रिया चांगली होते. याने डायजेशनसंबंधी वेगवेगळ्या समस्याही दूर होतात. जेवण केल्यावर पोट फुगण्याची समस्याही होत नाही. नारळ पाण्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट बॅलन्स होतात ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य