शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीही टीव्हीसमोर झोपता का? जाणून घ्या याचा आरोग्यावर काय होतो परिणाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 12:56 IST

बरेच लोक टीव्ही बघता बघता झोपतात. अनेकांना वाटतं की, त्यांना झोप येण्यासाठी ही बेस्ट बाब आहे. पण असं करणं घातक ठरू शकतं.

जास्तीत जास्त लोक रात्री उशीरापर्यंत टीव्ही बघतात. काही लोक नेटफ्लिक्सवर सीरिज बघतात तर कुणी यूट्यूबवर सिनेमा बघतात. टीव्ही बघण्यात काही वाईट नाही, पण जर तुम्ही टीव्ही बघता बघता झोपत असाल तर ही बाब तुमच्या आरोग्यासाठी फारच नुकसानकारक आहे. बरेच लोक टीव्ही बघता बघता झोपतात. अनेकांना वाटतं की, त्यांना झोप येण्यासाठी ही बेस्ट बाब आहे. पण असं करणं घातक ठरू शकतं.

भारतात अनेक लोकांना झोपण्याआधी टीव्ही बघण्याची सवय असते. पण रिसर्चनुसार, झोपताना टीव्ही बघितल्याने झोप डिस्‍टर्ब होते आणि यामुळे वजन वाढू शकतं. चला जाणून घेऊ याबाबत रिसर्च काय सांगतो.

2022 मधील स्‍टडीचा रिपोर्ट

शिकागोमधील नॉर्थवेस्टर्न यूनिवर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या रिसर्चर्सने 2022 मध्ये एक स्‍टडीचा हवाला देत सांगिलं की, 63 ते 84 वर्षाच्या काही लोकांना या रिसर्चमध्ये सहभागी करून घेण्यात आलं होतं. त्यांच्या एम्बिएंट लाइटचं प्रमाण आणि त्याच्या त्यांच्या आरोग्यावर होणार प्रभाव यावर लक्ष ठेवण्यात आलं.

स्‍टडीनुसार, जे लोक कमी प्रकाशात झोपतात, त्यांना डायबिटीस, लठ्ठपणा आणि हाय ब्लड प्रेशरचा धोका जास्त राहतो. त्यांनी असंही सांगितलं की, टीव्ही किंवा मोबाइलच्या प्रकाशातही झोपले तर त्यांना सकाळी इंसुलिन रजिस्‍टेंस जास्त होता. ज्यामुळे ब्‍लड शुगर लेव्हल नियंत्रित करण्याची क्षमता प्रभावित झाली.

रात्री टीव्हीच्या प्रकाशात मेलाटोनिन लेव्हल कमी होते. ज्यामुळे झोप बिघडते. त्याशिवाय डायबिटीस आणि हाय ब्लड प्रेशरचा धोकाही वाढतो. 

ब्‍लू लाइट सर्केडियन रिदम प्रभावित करतं

आर्टिफिशियल ब्‍लू लाइटच्या संपर्कात राहिल्याने मेलाटोनिन कमी होतं. ज्यामुळे तुम्हाला इच्छा असूनही झोप येत नाही. जे लोक इंसोमनियाने पीडित असतात त्यांना सल्ला दिला जातो की, लाइटच्या संपर्कात कमी रहावं. जेणेकरून चांगली झोप लागावी.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य