शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

सकाळी झोपेतून उठताच का पिऊ नये कॉफी? डॉक्टरांनी सांगितला मोठा धोका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 10:45 IST

Coffee Side Effect : जेव्हा सकाळी उठून तुम्ही कॉफीचं सेवन करता तेव्हा याने ब्लड शुगर वाढते आणि ब्लड शुगर वाढली तर अनेक समस्या होतात.

Coffee Side Effect : जास्तीत जास्त लोक आपल्या दिवसाची सुरूवात गरमागरम कॉफीने करतात. अनेकांना कॉफी प्यायल्यानंतर एनर्जेटिक आणि फ्रेश वाटतं. कॉफीमध्ये कॅफीन असतं जे रक्तात मिक्स होऊन मेंदुचा थकवा दूर करून त्याला अॅक्टिव बनवतं. डॉक्टर मायकल मोस्ले हे सांगतात की, सकाळी उठून जे लोक कॉफी पितात त्यांनी असं करणं बंद केलं पाहिजे. कारण जेव्हा सकाळी उठून तुम्ही कॉफीचं सेवन करता तेव्हा याने ब्लड शुगर वाढते आणि ब्लड शुगर वाढली तर अनेक समस्या होतात. ज्यात डायबिटीसचाही समावेश आहे.

डॉ. मोस्ले यांच्यानुसार, 'झोपेतून उठण्याआधी तुमचं शरीर तुम्हाला दिवसभरासाठी तयार करण्यास कोर्टिसोल म्हणजे तणावाचं हार्मोन रिलीज करतं. जर यावेळी कॉफीचं सेवन कराल तर तुमचं कोर्टिसोल लेव्हल आधीच वाढलं आहे, त्यामुळे तुमच्या ब्लड शुगरला किक मिळते. पण हेही लक्षात ठेवा की, याचा धोका विना दुधाची कॉफी पिणाऱ्या लोकांनाही होतो. कारण जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुमची ब्लड शुगर आधीच वाढलेली असते आणि जर सकाळी कुणी कॅफीन पितं तेव्हा त्यांची ब्लड शुगर लेव्हल आणखी वाढते.

डॉ. मोस्ले यांनी सल्ला दिला की, 'सकाळी झोपेतून उठल्यावर कमीत कमी एक तास तरी कॉफीचं सेवन करू नये. याने कोर्टिसोल हार्मोनची लेव्हल कमी होणं सुरू होईल आणि याद्वारेच ब्लड शुगरही कंट्रोल केली जाऊ शकते. मला असंही आढळलं की, जेवण केल्यावर लगेच चालल्याने ब्लड शुगर कमी करण्यास बरीच मदत मिळते. कारण चालण्याने मसल्स एक्ट्रा शुगरचा उपयोग करतात. ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं अनेकांसाठी महत्वाचं आहे कारण याने धमण्यांना नुकसान पोहोचू शकतं'.

भारत डायबिटीसची राजधानी

भारतात दिवसेंदिवस डायबिटीसच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. भारतात 10 कोटी लो डायबिटीस, 13 कोटी 60 लाख रूपये प्री-डायबिटीस आणि 31.5 कोटी लोक हाय ब्लड प्रेशरने पीडित आहेत. पण फार कमी लोकांना हे माहीत असतं की, ते या आजाराने ग्रस्त आहेत.

डॉ. मोस्ले म्हणाले की, 'यूकेमध्ये अंदाजे सात मिलियन लोक प्री-डायबेटिक आहेत म्हणजे त्यांची शुगर वाढलेली आहे. त्यांना टाइप 2 डायबिटीसचा धोका आहे. भलेही तुम्हाला माहीत नसेल, पण टाइप 2 डायबिटीसच्या आधी केवळ प्री-डायबिटीस झाल्यानेही तुम्हाला अवेळी मृत्यूचा 60 टक्के धोका असतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेहHealthआरोग्य