शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
2
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
3
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
4
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
5
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
6
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
7
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
8
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
9
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
10
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
11
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
12
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
13
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
14
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
15
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...
16
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
17
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
18
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
19
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
20
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव

दारू प्यायल्यावर हॅंंगओव्हर होतो म्हणजे शरीरात नेमकं काय होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 12:30 IST

What is hangover? : दारू पिणाऱ्या लोकांना हॅंगओव्हर हा शब्द चांगलाच पाठ आहे. पण हॅंगओव्हर होतो म्हणजे शरीरात नेमकं काय होतं हे कुणालाच माहीत नसतं.

What is hangover? : काही लोक दारू प्यायला असे बसतात जशी त्यांना आयुष्यात कधीच दारू प्यायला मिळणार नाही. म्हणजे ते प्रमाणापेक्षा जास्त दारू पितात. एकापाठी एक पेग गिळून ते बादशाह बनतात. पण काही वेळातच ती दारू त्यांना जमिनीवर लोळायला भाग पाडते. तेव्हा अनेकांना हेच वाटत असतं की, कशीतरी झोप आली पाहिजे. अनेकजण तर असंही म्हणतात की, उद्यापासून दारू पिणारच नाही.

मग काय अनेकदा उलट्या केल्यानंतर मग कशीतरी झोप येते. पण हे इतक्यावरच थांबत नाही. काही तासांनी एक वेगळाच खेळ सुरू होतो. त्याला तळीरामांमध्ये हॅंगओव्हर म्हणून ओळखलं जातं. हॅंगओव्हरमध्ये (Hangover) व्यक्तीचं डोकं जड होऊ लागतं, चक्कर येऊ लागते आणि फारच थकवा जाणवतो. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, हे सगळं दारू प्यायल्याच्या काही तासांनंतर होतं. म्हणजे तोपर्यंत दारू शरीरातून निघूनही गेलेली असते.  

काय असतो हॅंगओव्हर?

दारू एथेनॉलपासून तयार केली जाते. जेव्हा आपण दारू पितो तेव्हा याने आपल्या शरीरात असलेले एंजाइम दुसऱ्या केमिकलमध्ये रूपांतरित होतात. यात सर्वात महत्वाचं एसिटेल्डिहाइड आहे. ज्याला एंजाइम तोडून एका केमिकलमध्ये रूपांतरित करतं. ज्याला एसीटेट म्हटलं जातं. हे एसीटेट नंतर फॅटी अॅसिड आणि पाण्यात रूपांतरित होतं.

आता तर काही वैज्ञानिक असंही म्हणतात की, या एसिटेल्डिहाइडमुळे हॅंगओव्हर होतो. पण असेही काही रिसर्च समोर आले आहेत की, जे हे नाकारतात. म्हणजे या रिसर्चमध्ये आढळून आलं की, हॅंगओव्हर आणि एसिटेल्डिहाइड यांच्यात काहीच संबंध नाही. अशात काही तज्ज्ञांचं मत आहे की, हॅंगओव्हरसाठी कॉन्जेनर्स नावाचं केमिकल जबाबदार आहे जे व्हिस्की तयार करताना यात मिश्रित होतं. सांगितलं असंही जातं की, दारूचा रंग जेवढा डार्क तेवढी जास्त त्यात नशा असते. हॅंगओव्हरही यामुळे जास्त होतो.

सोबतच जेवढी जास्त दारू पोटात टाकाल, हॅंगओव्हरही तेवढा जास्त होतो. यात वयाचाही भाग आहे. जर तुम्ही रिकाम्या पोटी दारू प्यायलात तर हॅंगओव्हर जास्त होईल. कारण रिकाम्या पोटी दारू प्यायल्याने ती शरीरात जास्त एब्जॉर्ब होते आणि जास्त नशा होते.

डोकेदुखी, थकवा आणि उलटीचं कारण?

आता प्रश्न असा आहे की, दारू प्यायल्याने उलटी, डोकं जड वाटणे आणि थकवा ही लक्षणे का दिसतात? यामागे कारण हे आहे की, दारू रक्तात मिश्रित होते. सोबतच वेगाने पाणी एब्जॉर्ब करते. तेच पुन्हा पुन्हा लघवीलाही जावं लागतं. अशात शरीरात पाण्याची कमतरता झाली तर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जास्त दारू प्यायल्याने आपलं शरीर तिच्यासोबत लढण्यासाठी ताकद लावतो. जेणेकरून शरीरावर वाईट प्रभाव पडू नये. हेही कारण आहे की, व्यक्ती थकलेला आणि कन्फ्यूज वाटतो. 

उलटीचं कारण आपल्या पचन तंत्रात तयार होणारं अॅसिड आहे. ज्याचं प्रमाण दारू प्यायल्यानंतर वाढतं. सोबतच अल्कोहोल शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचं ते बॅलन्सही बिघडवतं ज्याच कनेक्शन थेट आपल्या मेंदूसोबत असतं. याच कारणाने अस्वस्थता आणि डोकेदुखीची समस्या समोर येते. 

टॅग्स :Healthआरोग्यInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स