शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

या 5 प्रकारच्या लोकांचं जास्त रक्त पितात डास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 17:01 IST

20 टक्के लोक असे असतात ज्यांच्याकडे डास जास्त आकर्षित होतात. म्हणजे डास इतरांपेक्षा या लोकांना चावतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की डास काही लोकांना जास्त का चावतात.  

डास जेव्हा मनुष्यांना चावतात तेव्हा त्यांच्या चावण्यामुळे अनेक प्रकारचे जीवघेणे आजार होतात. तसे तर डास सर्वांनाच चावतात. पण एका रिसर्चनुसार हा खुलासा झाला आहे की, 20 टक्के लोक असे असतात ज्यांच्याकडे डास जास्त आकर्षित होतात. म्हणजे डास इतरांपेक्षा या लोकांना जास्त चावतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, डास काही लोकांना जास्त का चावतात.  

1) डार्क रंगांचे कपडे पाहून चावतात डास

सर्वसाधारणपणे डास कुणालाही पाहिल्यावर किंवा त्या व्यक्तीच्या विशिष्ट वासामुळे त्याला चावतात. तज्ज्ञांनुसार, डासांची नजर फार चांगली असते. खासकरुन दुपारच्या वेळी ते मनुष्यांना शोधून शोधून चावतात. जेव्हा तुम्ही खासकरुन डार्क रंगांचे कपडे जसे की नेव्ही ब्लू, ब्लॅक किंवा लाल रंगांचे कपडे परिधान केल्यास तुम्हाला डास सहज शोधून काढतात. 

2) या रक्तगटाच्या लोकांना करतात टार्गेट

रक्त हेच डासांसाठी सर्वकाही असतं. डासांसाठी रक्त हे एकप्रकारे अमृतच असतं. फिमेल डास अंडे देण्यासाठी मनुष्यांच्या रक्तातील प्रोटीन मिळवतात. यातही काही आश्चर्य नाहीये की, डासांसाठी काही वेगळे रक्तगटही गरजेचे असतात. ओ आणि ए रक्तगट असलेल्या लोकांना डास अधिक चावतात. तर बी रक्तगट असलेल्यांना डास सामान्य रुपाने चावतात. 

3) कार्बन डाय-ऑक्साईड गॅस करते आकर्षित

डासांकडे इतकी समज असते की, ते 166 फूटच्या अंतरावरुन सुद्धा कार्बन डाय ऑक्साईड गॅसला ओळखू शकतात. या गॅसकडे डासांचं जास्त आकर्षण असतं. मनुष्य हे ऑक्सिजन घेऊन कार्बन डाय ऑक्साईड सोडतात. याच कारणामुळे डास हे मनुष्यांच्या नाकाजवळ जास्त फेऱ्या मारतात. 

4) गरमी आणि घाम

कार्बन डाय ऑक्साईडसोबतच आणखीही काही असे घटक आहेत ज्याकडे डास आकर्षित होतात. गरमीच्या दिवसात शरीरातून निघणाऱ्या घामातून लॅक्टिक अॅसिड, यूरिक अॅसिड आणि अमोनिया हे घटक डासांना आकर्षित करतात. ज्या लोकांना जास्त घाम येतो त्यांना डास जास्त चावतात. 

5) गर्भवती महिलांना 

एका रिसर्चमधून खुलासा झाला आहे की, एक गर्भवती महिला एका सामान्य महिलेपेक्षा जास्त कार्बन डाय ऑक्साईड बाहेर सोडते. त्यामुळे गर्भवती महिलांकडेही डास जास्त आकर्षित होतात.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य