शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बदाम भिजवून खाण्यास का सांगितलं जातं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 16:24 IST

बदाम भिजवून खाण्याचे का सांगितले जाते? अनेकजण बदाम खातात पण याचा विचार कुणी करत नाही. चला जाणून घेऊया असे का सांगतात. 

आपल्या सर्वांनाच हे माहीत आहे की, बदाम भिजवून खाल्ल्याने बुद्धीला चालना मिळते. हेही सर्वांनाच माहीत आहे की, बदाम आपल्या आरोग्यासाठी किती फायद्याचे आहेत. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, बदाम भिजवून खाण्याचे का सांगितले जाते? अनेकजण बदाम खातात पण याचा विचार कुणी करत नाही. चला जाणून घेऊया असे का सांगतात. 

बदाममध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. हे व्हिटॅमिन्स ई, जिंक, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि ओमेगा 3 अॅसिडचा स्त्रोत आहे. या सर्व पोषक तत्वांचा पूर्ण फायदा मिळावा यासाठी बदाम रात्रभर भिजत ठेवणे चांगलं मानलं जातं. चला जाणून घेऊया याचे फायदे...

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर बदाम खाणे तुमच्यासाठी फायेदशीर आहे. बदाम खाल्ल्याने भूक कमी लागते. एका अभ्यासानुसार, रोज एक मूठभर बदाम खाल्ल्याने तुम्ही काही दिवसातच बरंच वजन कमी करु शकता. यातील अॅंटी-ऑक्सीडेंट सुद्धा फायदेशीर आहे. भिजवलेल्या बदामात व्हिटॅमिन बी 17 आणि फोलिक अॅसिड असतं, जे कॅन्सरपासून सुरक्षा करतं. 

1. गर्भाची योग्यरित्या वाढ होण्यास मदत होते

गरोदर स्त्रियांनी नियमित भिजवलेले बदाम खाणे तिच्यासोबतच गर्भाच्या वाढीसाठीदेखील फार आरोग्यदायी आहेत. बदामातील फॉलिक अ‍ॅसिड गर्भाच्या मेंदूची आणि चेतासंस्थेची वाढ  करण्यास मदत करतात. भिजवलेले बदाम मऊ असल्याने गरोदर  स्त्रियांना सहज पचायला शक्य असतात. 

2. पचनशक्ती सुधारण्यास मदत करते

‘जर्नल ऑफ फूड सायन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार कच्चे व भिजवलेले बदाम पाण्यात भिजवल्याने पचन सुधारते. कारण भिजवलेल्या  बदामाच्या सालींमध्ये असणारी एन्जाईम्स शरीरातील मेद कमी करण्यास मदत होते. परिणामी पचनशक्ती सुधारते.

3. रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवते 

रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम फारच फायदेशीर आहे. ‘जर्नल ऑफ फ्री रॅडीकल रिसर्च’ यांच्यानुसार बदामातील ‘अल्फा टेकोफेरॉल्स’ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बदाम खाल्ल्यास यामुळे नैसर्गिकरित्या रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते. असे देखील या संशोधनातून पुढे आले आहे. विशेषतः 30 -70वयोगटातील पुरूषांमध्ये हा फरक प्रामुख्याने आढळून आला.

4. हृदयाचे कार्य सुधारते 

जर्नल ऑफ न्युट्रीशनच्या अहवालानुआर बदामातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृद्यावरील ताण कमी होण्यास मदत होते तसेच हृदयविकारांपासूनही बचाव होतो. त्यामुळे आहारात बदामांचा समावेश अवश्य करावा.

5. शरीरातील ‘बॅड कोलेस्ट्रेरॉल’ वर नियंत्रण ठेवते

आजकाल तणावग्रस्त जीवनशैली तसेच वेळी अवेळी खाल्ल्याने शरीरात कोलेस्टॉल वाढण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस वाढल्याने हृदयविकार जडण्याची समस्या बळावत आहे.  बदामांमुळे शरीरातील ‘बॅड’ कोलेस्टेरॉल कमी होऊन ‘गुड’ कोलेस्टेरॉल वाढतात. 

6. वजन घटवण्यास मदत होते  

‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटी रिलेटेड मेटॅबोलिक डिसऑर्डर’ यांच्या अहवालानुसार  बदामात कॅलरी कमी असल्याने त्याचा आहारात समावेश करावा. बदामामुळे पचन सुधारते, वारंवार लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळते तसेच लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या मेटॅबॉलिक सिंड्रोमवरही नियंत्रण मिळते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य