शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

WHO Explain : समोर आलं भारतात कोरोना संसर्ग वाढण्याचं मोठं कारण; WHO तज्ज्ञांकडून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 11:48 IST

WHO Explain : या व्हायरसपासून बचावासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. 

भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करावा लागत आहे. कोरोनचा कहर दिवसेंदिवस भारतात वाढत आहे. अशा स्थिती जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन (Soumya Swaminathan) यांनी सांगितले की, भारतात कोरोनाच्या नव्या वेरिएंटमुळे कोरोनाचा विस्फोट होत आहे. हा नवीन स्ट्रेन जास्त संक्रामक आणि जीवघेणा आहे. या व्हायरसपासून बचावासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. 

AFP ला दिलेल्या मुलाखतीत सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की,  ''भारतात कोरोनाचा उद्रेक होण्याचं कारण नवीन वेरिएंट आहे. भारतात या वेरिएंटचा वेगानं वेगानं प्रसार होत आहे. भारतात शनिवारी ४ हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा सामना करावा लागला आहे. तर  ४ लाखांपेक्षा जास्त नवीन प्रकरणं समोर आली आहेत. ''

डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या की, ''ऑक्टोबरमध्ये भारतात सापडलेला कोरोनाचा नवा वेरिएंट B.1.617 आता दररोज कोट्यावधी लोकांना आपलं शिकार बनवत आहे . हा प्रकारही वेगाने बदलत आहे, जो लोकांसाठी घातक ठरत आहे.  कोरोनाचा हा नवीन प्रकार वास्तविक स्वरूपापेक्षा बराच धोकादायक आहे आणि तो लोकांमध्ये खूप वेगाने पसरत आहे.''

कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

''अमेरिका आणि ब्रिटन सारखे देश हा प्रकार गंभीरपणे घेत आहेत आणि मला आशा आहे की, डब्ल्यूएचओ लवकरच यावर काही नियम ठरवेल. हा प्रकार इतका धोकादायक आहे की तो शरीरात एंटीबॉडी बनविणे देखील थांबवतो आणि फार वेगात बदलतो. भारतात संक्रमित लोकांची संख्या झपाट्यानं वाढण्यामागे नव्या स्ट्रेन इतकाच लोकांचा निष्काळजीपणाही कारणीभूत ठरत आहे. सोशल डिस्टेंसिंग, मास्कचा वापर लोकांनी  कमी केला आहे.'' असं मत त्यांनी यावेळी मांडले.

अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार

त्या म्हणाल्या की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर राजकारण्यांनी आयोजित केलेले मोठ्या प्रमाणात निवडणूक मेळावे देखील यासाठी जबाबदार आहेत. या रॅलीने कोट्यवधी लोकांना आकर्षित केले, ज्यामुळे त्याचा प्रसार अधिक वेगाने झाला. पुरेशा लोकांच्या लसीकरणासह आपल्याला कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेचा सामना करावा लागणार आहे.'' 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयcorona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाHealthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लसExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला